शेडेकर यांच्या गावकऱ्यांकडून आमदार राणेंचा निषेध

शेडेकर यांच्या गावकऱ्यांकडून आमदार राणेंचा निषेध

गडहिंग्लज : आमदार नीतेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतून धक्काबुक्की केली. या कृत्याचा शेडेकरांचे गावकरी करंबळीकरांनी (ता. गडहिंग्लज) निषेध केला. नीतेश राणे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे.

श्री. शेडेकर यांचे मूळ गाव करंबळी हे आहे. शेडेकर यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळाल्यापासून गावात संतापाची भावना आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास करंबळीकर ग्रामस्थ येथील दसरा चौकातील शिवाजी पुतळ्याजवळ जमा झाले. महाविद्यालयीन तरुण-तरुणीची संख्याही लक्षणीय होती. तेथून सारे प्रांत कार्यालयावर आले. आमदार नीतेश राणेंच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी निवेदन स्वीकारले.

नीतेश राणे यांना अटक झाली आहे. पण, त्यांना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करावा. सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी. उपअभियंता शेडेकर यांना तत्काळ संरक्षण पुरविण्यात यावे. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी. तसेच नीतेश राणे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. 
ग्रामपंचायत, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, शिवसेना, आजी-माजी सैनिक संघटना, समविचारी शिक्षक मंच, तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, शुक्रवारी (ता. 5) रात्री करंबळी येथे ग्रामस्थ बस स्थानक परिसरात जमले. त्यांनी नीतेश राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. राणेंच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com