देवगडात नीतेश राणेंचा 'मास्टर स्ट्रोक' 

आमसभेत प्रकल्पाला अप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्याची मागणी झाली होती. शासनाला जाग येईपर्यंत आपण प्रक्रिया पूर्ण केली आहे. स्थानिक राजकारणात अप्पांचे नाव मोठे आहे. प्रकल्पाला नाव दिल्याने अप्पांकडून आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल. पर्यटनस्थळ म्हणून परिसराचा विकास करणार आहे.- नीतेश राणे, आमदार
देवगडात नीतेश राणेंचा 'मास्टर स्ट्रोक' 

देवगड (सिंधुदुर्ग): येथील पवनऊर्जा प्रकल्पाला माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्याच्या आमसभेत झालेल्या मागणीची शासनाकडून पूतर्ता होत नसल्याने आज आमदार नीतेश राणे यांनी पुढाकार घेत याची कार्यवाही केली. पवनऊर्जा प्रकल्पाला अप्पांचे नाव देऊन अप्पांचे पुत्र प्रकाश उर्फ बंडू गोगटे यांच्या हस्ते नामफलकासमोर श्रीफळ वाढवून त्यांनी भाजपवर कडी केली.

यामुळे भाजपची अवस्था आता "धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय' अशीच होणार आहे. येथील पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असला तरी उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. भाजपकडून उद्‌घाटनाच्या वारंवार तारखा जाहीर झाल्या मात्र प्रत्यक्षात झाले नाही. त्यातच प्रकल्पाला माजी आमदार स्वर्गीय अप्पासाहेब गोगटे यांचे नांव देण्याची आमसभेत मागणीही झाली. राज्यात युतीचे सरकार आणि अप्पा सुमारे चारवेळा आमदार होऊनही याची पूतर्ता शासनाकडून होत नसल्याची जाणीव झाल्याने आमदार श्री. राणे यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी "अप्पा गोगटे पवनऊर्जा प्रकल्प' असे नामकरण करून तसा फलकही झळकवला.

विशेष म्हणजे अप्पांचे पुत्र प्रकाश यांच्याच हस्ते श्रीफळ वाढवून भाजपची कोंडी करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे आता भाजपचे पदाधिकारी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी प्रकाश गोगटे यांनी, "प्रकल्पाला अप्पांचे नाव दिल्याचा आनंद झाल्याची' प्रतिक्रीया दिली.

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com