नीतेश राणेंनी सुनावताच कार्यकर्ते पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये घुसले! 

त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून अटकेची कारवाई सुरू करण्यात आली.
नीतेश राणेंनी सुनावताच कार्यकर्ते पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये घुसले! 

कणकवली (सिंधुदुर्ग): महामार्ग उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की, त्यांच्या अंगावर चिखल ओतणे, पुलाला बांधून ठेवणे याप्रकरणी आमदार नीतेश राणेंसह, नगराध्यक्ष समीर नलावडे व इतर अन्य 50 स्वाभिमान कार्यकर्त्यांवर आज कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हा गुन्हा कणकवली पोलिस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर स्वाभिमान कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. यात आमदार राणे स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी स्वाभिमान कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याला घेराओ घातला होता.

सायंकाळी सहाच्या सुमारास आमदार श्री. राणे कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी नामांकित मोरे आणि पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी फक्त राणे यांनाच केबिनमध्ये घेतले आणि इतर कार्यकर्त्यांना बाहेर थांबवले. हा प्रकार राणेंच्या लक्षात येताच, त्यांनी आम्ही जनतेच्या प्रश्‍नासाठी लढायचे, अंगावर गुन्हे घ्यायचे आणि तुम्ही बाहेर थांबून मजा बघताय का? असे कार्यकर्त्यांना सुनावले. त्यानंतर स्वाभिमानचे कार्यकर्ते पोलिस बंदोबस्त तोडून पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये घुसले आणि पोलिस उपविभागीय अधिकारी श्री.मोरे यांच्याशी हुज्जत घातली तसेच सुमारे अर्धातास कार्यकर्ते आणि पोलिस यांची बाचाबाची सुरू होती.

दरम्यान आमदार राणे यांनी गुन्हा नोंद झाल्या प्रकरणी अधिकार्‍यांना खडसावले. लोकशाहीमध्ये आंदोलने करायची नाहीत का? जनतेचा जीव धोक्यात असेल तर रस्त्यावर उतरायचे नाही का? जनतेच्या प्रश्‍नासाठी आम्ही आंदोलन केले आणि त्यासाठी गुन्हा दाखल करत असाल तर माझा राजीनामा घ्या. आमदार जनतेसाठी असतो आणि जनतेचे प्रश्‍न सुटत नसतील आमदारकीचा काय उपयोग असे राणे म्हणाले. तर पावसाळा संपेपर्यंत महामार्ग सुस्थिती राहील याची ग्वाही पोलिस प्रशासनाने द्यावी आम्ही आंदोलन करत नाही असे म्हणणे कार्यकर्त्यांनी मांडले.

आमदार राणे यांनी महामार्ग सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला. जोपर्यंत महामार्ग सुस्थितीत होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलने करणार तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा असेही राणे असा इशारा देखील श्री.राणे यांनी यावेळी दिला. सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत कणकवली पोलिस ठाण्यात स्वाभिमान कार्यकर्ते आणि पोलिस अधिकार्‍यांत वादंग सुरू होता. अनेक आमदार राणेंसह प्रमुख कार्यकर्त्यांनी अटक करून घेण्याचे घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून अटकेची कारवाई सुरू करण्यात आली.

महामार्ग उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत आणि शिवसुंदर देसाई यांना दुपारीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर मामा हळदिवे, निखिल आचरेकर, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री आदींसह अन्य कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई सुरू करण्यात आली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com