Nitesh Rane Hard Criticism on Cm Uddhav Thackeray | Sarkarnama

नितेश राणे म्हणतात..वाॅचमन नको, कॅप्टन हवा!

संपत मोरे
शुक्रवार, 27 मार्च 2020

आम्हाला वाॅचमनची नाही तर नेतृत्व करणाऱ्या कॅप्टनची गरज आहे अशी टिका आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली आहे

पुणे : ''आम्हाला वाॅचमनची नाही तर नेतृत्व करणाऱ्या कॅप्टनची गरज आहे."अशी टिका आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली आहे. कोरोनाच्या संकटाने सर्वात जास्त महाराष्ट्राला ग्रासले आहे मात्र राज्य सरकारकडे कोणतेही उत्तर नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे.

राणे यांनी फेसबूकवर पोस्ट करून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे."महाराष्ट्र सरकारने अजून मदत का जाहीर केली नाही? कोरोना च्या संकटाने सर्वात जास्त महाराष्ट्राला ग्रासलं आहे आणि राज्य सरकारकडे कोणतेही उत्तर नाही. जरी कोरोना मुळे नाही तर आर्थिक समस्यांमुळे अनेकांचा जीव जाईल. राज्य सरकार कशाची वाट बघतय? आम्हाला वॉचमनची नाही, नेतृत्व करू शकणाऱ्या कॅप्टन ची गरज आहे."असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

"उत्तर प्रदेश, केरळ, हरियाणा, पंजाब व हिमाचल प्रदेश राज्य सरकार पॅकेज जाहीर करून गोरगरिबांना मदत करत आहेत. महाराष्ट्र सरकारने अजून एक रुपयाचीही मदत जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्री मातोश्री मधल्या सोप्यावर बसून म्हणतात...हवा येऊ द्या...मूर्खांचा स्वर्ग !" असे राणे यांनी आपल्या फेसबूक पोस्टवर लिहिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख