nitesh rane criticise deepak kesarkar | Sarkarnama

दीपक केसरकर मराठाद्वेषी: नीतेश राणे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात पोलिस प्रशासनाकडून मराठा समाजाच्या तरुणांना नोटीसा दिल्या जात आहेत. मराठा व्देषी राजकारण होत आहे. कारण जिल्ह्याला मराठाद्वेषी पालकमंत्री मिळाले आहेत, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली. 

येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सिंधुदुर्गात चोऱ्या, दरोडे, मटका, जुगार, अवैध दारू वाहतूक होत आहे. ते थांबविण्यासाठी पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करावा. चोरट्यांना धाक दाखविण्यासाठी सिंघम व्हावे. मराठ्याला धाक दाखविण्याचा प्रयत्न करू नये. असे घडले तर आम्ही त्याची गय करणार नाही. मराठा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा, असे आव्हान यावेळी आमदार राणे यांनी दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख