नीतेश राणेंचे सावंतांना चॅलेंज : 'झेडपी'चे ते दहा सदस्य समोर आणा !

जिल्ह्याची जबाबदारी ही नारायण राणे यांच्याकडे असणार का? असा प्रश्‍न त्यांना केला असता माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडेच जिल्ह्याची जबाबदारी असून ती तशीच राहणार आहे. राणे हे आमचे मार्गदर्शक राहतील. पक्षाच्या पुर्वीच्या ढाच्यात अद्याप कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
sawant-rane
sawant-rane

सांवतवाडी :  कोणी कितीही वल्गना केल्या तरी जिल्हा परिषदेवर भाजपाचीच सत्ता स्थापन होणार आहे . मात्र आपल्याकडे दहा सदस्य आहेत, असा दावा करणाऱ्यांनी ते समोर आणुन दाखवावेत, असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी आज येथे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांचे नाव न घेता दिले.

श्री. राणे म्हणाले, "तालुक्‍यात होणाऱ्या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत आंबेगावमधुन मानसी परब तर बांद्यातून अक्रम खान यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकणार आहे. सावंतवाडी पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून योग्य वेळी पक्षाचे वरिष्ठ याबाबत भूमिका जाहीर करतील.''

श्री. राणे म्हणाले, "जिल्ह्यात आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकातील मतांची संख्या बघता भाजपा एक नंबर आहे; मात्र असे असले तरी प्रत्येक तालुक्‍यात पक्ष वाढविण्याच्या अनुंषगाने जोरदार काम करण्यावर आमचा भर राहणार आहे. घराघरात भाजपा पोहचवून संघटना वाढीवर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. सध्याच्या ध्येय धोरणानुसार संघटना पर्व सुरू असुन यामध्ये सदस्य नोंदणीपासून संघटना बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महेश सारंग व अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संघटनात्मक ताकद उभी करण्यात येणार आहे.''

राज्यात स्थिर सरकार हवे, असे लोकप्रतिनिधी म्हणून माझे मत आहे. मतदारांनी महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे; मात्र स्वार्थ साधणे हा हेतू नाही. आमचा हेतू शुद्ध आहे. लवकरच राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी वरिष्ठ योग्य पावले उचलतील, असेही राणे म्हणाले.


कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना बजावलेला व्हीप तसेच त्यांनी दहा सदस्य सोबत असल्याचे सांगितले आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, "आम्ही 27 सदस्यांचा गट स्थापन केला असून सहा सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे काही झाले तरी जिल्हा परिषदेवर भाजपचीच सत्ता येणार आहे. ज्यांच्याकडे दहा सदस्य असतील ते त्यांनी समोर आणावेत.''

येथील भाजप कार्यालयात आमदार राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, संजू परब, शहराध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, उदय नाईक, प्रमोद कामत आदी उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com