शिवसेनेच्या प्रखर विरोधानंतरही नीतेश राणेंच्या हातात भाजपने दिले कमळ 

 शिवसेनेच्या प्रखर विरोधानंतरही नीतेश राणेंच्या हातात भाजपने दिले कमळ 

कणकवली : माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचे आमदार पुत्र नीतेश राणे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राणे यांना शिवसेनेचा कडवा विरोध आहे. 

राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. उद्धव यांना राणे हे नेहमीच विरोध करीत आले आहेत. महायुतीत राणे नको अशी भूमिका शिवसेना नेहमीच घेत आली आहे. त्यामुळे राणेंचा भाजप प्रवेश होत नव्हता. हो नाही करीत अखेर नीतेश रारे यांनी आज भाजपत प्रवेश केला. हा प्रवेश साधेपणाने झाला आहे. कोणतेही शक्तीप्रदर्शन टाळण्यात आले. 

कणकवली मतदारसंघातून लढण्यासाठी नीतेश राणे यांना भाजपने एबी फॉर्मही दिला आहे. त्यामुळे आजपासून ते भाजपचे अधिकृत सदस्य बनले आहे. राणे यांचा शिवसेना, कॉंग्रेस आणि भाजप असा प्रवेश राहिला आहे. नीतेश यांना उमेदवारी दिल्याने आता शिवसेना कोणता निर्णय घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कणकवलीत राणेंच्या विरोधात सतीश सावंत यांना उतरविण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली असल्याचेही समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com