Nitesh rane atacks Shivsena but praises Mumbai municipal corporation | Sarkarnama

नितेश राणेंकडून सेनेवर टीका अन महापालिकेचे कौतुक

प्रशांत बारसिंग
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

परवा मुंबईत झालेल्या दुर्घटनेवरूंन नितेश यांनी शिवसेनेवर टीका करताना महापालिकेचे नकळत कौतुक करुन  टाकले.

मुंबई  : जेष्ठ नेते नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांचे शिवसेनेसोबत असलेले विळयाभोपळयाचे नाते सर्वश्रुत आहे. मात्र नीतेश यांच्याकडून शिवसेनेवर टीका करताना नकळत सेनेची सत्ता असताना मुंबई महापालिकेचे मात्र कौतुक करण्यात आले.

कोणत्याही मुद्यावर राणे पितापुत्र उद्धव ठाकरे यांच्यासह सेना नेते आणि  मुंबई   महापालिकेवर तूटून पडण्याची संधी सोडत नाहीत. गेली 25 वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिका कारभाराचे ते वाभाड़े काढत असतात. महापालिकेतील भ्रष्टाचार, गचाळ कारभार, त्यामुळे नागरिकांना भेडसावणारे प्रश्न यांचा उल्लेख करत महापालिकेवर सडकून टीका करतात. मात्र परवा मुंबईत झालेल्या दुर्घटनेवरूंन नितेश यांनी शिवसेनेवर टीका करताना महापालिकेचे नकळत कौतुक करुन  टाकले.

चेंबूर येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरित स्फोट झाल्यावर, अशाच रत्नागिरीतिल नाणार प्रकल्पाचा मुद्दा नितेश यांनी उपस्थित केला.  नाणार   बाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, अशी टिका त्यांनी केली. 'मुंबईतील दुर्घटनेच्या दिवशी महापालिकेची अग्निशमन यंत्रणा अत्याधुनिक असल्याने मोठा अनर्थ टळला, नाणार रिफायनरित अशी आग लागली तर  मुंबईतुन अग्निशमन बंब  मागवणार आहात का?" असा ट्विटर वरुन  सवाल करत नितेश यांनी मुंबई महापालिका यंत्रणा 'सक्षम' असल्याची कबूली दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख