नारायण राणेंसाठी कणकवली सोडायची तयारी - नीतेश

नारायण राणेंसाठी कणकवली सोडायची तयारी - नीतेश

कणकवली : "नारायण राणे पुढच्या विधानसभेमध्ये असणे गरजेचे आहे. कणकवली मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे. यामुळे प्रसंगी राणेंसाठी हा मतदारसंघ सोडण्याची माझी तयारी आहे. सावंतवाडीसाठीही स्वाभिमान वेगळा विचार करत आहे; मात्र पुढच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणे निश्‍चित झाल्यानंतर धोरण ठरवले जाईल,' असे सुतोवाच आमदार नीतेश राणे यांनी आज येथे केले. 

राजकीय विषयावर चर्चा करताना श्री. राणे म्हणाले, ""महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विधानसभेच्या बहुतांशी जागा लढण्याच्या तयारीत आहेत; मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती पुढच्या काही दिवसांत निश्‍चित झाल्यानंतर स्वाभिमान पक्ष आपले उमेदवार जाहीर करेल. विधानसभेच्या कणकवली आणि कुडाळ मतदारसंघासाठी पक्षाची उमेदवारी जवळपास निश्‍चित झालेली आहे; मात्र सावंतवाडी मतदारसंघात वेगळा विचार होऊ शकतो. खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात येतील तेव्हा जिल्हा कार्यकारिणीमध्ये याबाबतचा खुलासा होईल असे त्यांनी सांगितले. 

येत्या नऊ ऑगस्टला जिल्हा कार्यकारिणीची बैठक आहे. त्यानंतर राज्यातील विविध भागांत स्वाभिमान पक्षातून लढणाऱ्या उमेदवारांची नावे निश्‍चित होऊ शकतात; मात्र राज्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे, त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. विधानसभेसाठी शिवसेना-भाजपची युती होणार का, यावरही बरेच काही निश्‍चित होईल.'' 
कणकवली सुरक्षित मतदारसंघ 
खासदार राणे विधानसभेत यावेत, असे कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे कणकवली मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षित आहे. तशी वेळ आल्यास आम्ही तो सोडू शकतो आणि दुसरा पर्याय स्वीकारू शकतो. या सगळ्या जर-तरच्या शक्‍यता आहेत; मात्र पक्षाची नेमकी भूमिका श्री. राणे जाहीर करतील असेही आमदार नीतेश राणे यांनी सांगितले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com