अभियंत्याला चिखलाची आंघोळ, नितेश राणेंकडून अभियंत्याचा अपमान

 अभियंत्याला चिखलाची आंघोळ, नितेश राणेंकडून अभियंत्याचा अपमान


सिंधुदुर्ग : गडनदीवरील पुलाला खड्डे पडल्याच्या कारणावरून कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी एख अभियंत्यांचा अत्यंत चुकीची भाषा वापरून अपमान केला. इतक्‍यावरच ते थांबले नाहीत तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्याच्या अंगावर चिखलाची बादली ओतली व तेव्हा त्या कार्यकर्त्यांना त्यांनी साथ दिली. ही बादली त्यांच्या अंगावर नीट पडावी यासाठी त्यांनी त्या अधिकाऱ्याला त्या कार्यकर्त्यांच्या बाजुला ढकले असल्याचे वाहिन्यावर व्हायरल झालेल्या चित्रफीतीत दिसत आहे. 

पुलाला खड्डे का पडले असे विचारत त्यांनी या अधिकाऱ्याला एकेरी भाषेत बरेच काही ऐकवले त्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्याला पुलाला बांधून ठेवण्याचाही प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी चिखल ओतल्यावर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी त्यांनी चिखल ओतण्याचे समर्थन केले आहे. सरकारी अधिकाऱ्याला मारहाण व त्यांचा एकेरी उल्लेख करून अपमान करणे खरे तर त्यांना महागात पडू शकते. मात्र मागे एकदा अशाच पद्धतीने त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन त्याच्या अंगावर व तिथल्या टेबलवर मासे फेकले होते तसेच अपमानजनक भाषा वापरली होती, त्यावेळीही त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे धाडस वाढून त्यांनी हा प्रकार केला असावा असे बोलले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com