निशिकांत पाटलांच्या उमेदवारीसाठी समर्थकांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न 

या दरम्यान रवी चव्हाण या तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला घेत समजूत काढली.
Jayant_Patil_Nishikant
Jayant_Patil_Nishikant

इस्लामपूर :  महायुतीच्या जागा वाटपात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने येथे भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अस्वस्थ समर्थक कार्यकर्त्यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे, असा आग्रह करीत त्यांच्या निवासस्थानासमोरच पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून लढू आणि सेटलमेंट करणाऱ्या धडा शिकवू असा इशाराही निशिकांत पाटील यांनी दिला. 

महायुतीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या नगराध्यक्ष श्री. पाटील यांच्यासमोर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

त्यातून त्यांनी माघार घेऊ नये म्हणून आज समर्थक दत्त टेकडी परिसरातील त्यांच्या निवासस्थासमोर जमले. तरुणांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. "काही झाले तरी दादांनी लढलेच पाहिजे' असा आग्रह धरला. 

श्री. पाटील यांनी दोन वर्षांपासून कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्षवाढीसाठी चांगले काम केले. कोणताही भेद न करता सर्वसमावेशक काम केले. मात्र त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत सेटलमेंट केली. दादांनी धीर न सोडता पुन्हा खंबीर उभे रहावे. पक्ष नाही तर अपक्ष म्हणून लढावे असा आग्रह धरला.

या दरम्यान रवी चव्हाण या तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला घेत समजूत काढली. निशिकांत पाटील यांच्यासह कार्यकर्ते तेथून जुन्या तहसील कार्यालय आवारात आले. "निशिकांतदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशी घोषणाबाजी करीत दुचाकी फेरी निघाली. श्री. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. 

भाजप कार्यालयात आल्यानंतर श्री. पाटील म्हणाले,"सामान्य कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे. गेल्या दोन वर्षांपासून उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो. मात्र काही लोकांनी केलेल्या सेटलमेंटमुळे घात झाला. आता या निवडणुकीत ही सेटलमेंट गाडून टाकण्याची वेळ आली आहे. पक्षाला न दुखावता कार्यकर्ता हाच पक्ष मानून अपक्ष म्हणून निवडणूक लढवू.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com