नाशिकच्या प्रवेशद्वारावरचा झेंडा राखण्याचे यंदा कॉंग्रेसपुढे आव्हान! 

कॉंग्रेसने 2009 मध्ये शिवसेनेकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर कॉंग्रेसचा झेंडा लागल्याने मतदारसंघाची नवी ओळख निर्माण झाली. त्या अनुशंगाने येत्या निवडणुकीत मतदारसंघात विशेष चुरस असेल. यामध्ये विद्यमान आमदारांच्या कामगिरीचाही विचार होणार आहे. धरणाच्या तालुक्‍यात उन्हाळ्यातील टंचाई, सिंचनासाठी पाणी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, रोजगारनिर्मिती या विषयांवर विद्यमान आमदार निर्मला गावित यांना घेरण्यासाठी विरोधखांचे डावपेच सुरू आहेत.
नाशिकच्या प्रवेशद्वारावरचा झेंडा राखण्याचे यंदा कॉंग्रेसपुढे आव्हान! 

इगतपुरी : इगतपुरी मतदारसंघ म्हणजे नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार. सलग दोन टर्म कॉंग्रेसच्या निर्मला गावित यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे राखला आहे. विकासकामे, दांडगा जनसंपर्क आणि मीतभाषी स्वभाव हे यात त्यांचे यश दडले आहे. यंदा हॅटट्रीकसाठी शिवसेना- भाजपच्या माजी आमदारांनी आव्हान दिले आहे. भाजप प्रवेशाचे आवतन त्यांनी ठोकरले. तरीही राज्यातील राजकारणाची हवा पाहता त्यांना यंदा 'हॅटट्रीक'साठी कठीण परिश्रम घ्यावे लागणार हे नक्की आहे. 

कॉंग्रेसने 2009 मध्ये शिवसेनेकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर कॉंग्रेसचा झेंडा लागल्याने मतदारसंघाची नवी ओळख निर्माण झाली. त्या अनुशंगाने येत्या निवडणुकीत मतदारसंघात विशेष चुरस असेल. यामध्ये विद्यमान आमदारांच्या कामगिरीचाही विचार होणार आहे. धरणाच्या तालुक्‍यात उन्हाळ्यातील टंचाई, सिंचनासाठी पाणी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, रोजगारनिर्मिती या विषयांवर विद्यमान आमदार निर्मला गावित यांना घेरण्यासाठी विरोधखांचे डावपेच सुरू आहेत. आमदार गावित यांनीही विरोधकांच्या प्रचारातील हवा काढण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे आमदारांपेक्षा त्यांचे समर्थकच अधिक त्वेषाने विरोधकांचा समाचार घेत आहे. यंदा आघाडी असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते संदीप गुळवे त्यांच्या मदतीला असल्याने त्यांची बाजु सावरली आहे. 

गत निवडणुकीतील पराभूत उमेदवारांचे मतदार संघासाठी ठोस दायित्व काय? यावर कॉंग्रेसच्या प्रचाराचा भर आहे. तरीही आमदार गावित यांनी शब्द न पाळलेल्या आश्वासनांविषयी प्रचारात विरोधकांचा भर आहे. आदिवासी बहुल मतदारसंघ असल्याने जातीय राजकारण उभे करून गावित यांना निष्प्रभ करण्यासाठी गावितांच्या विरोधकांना एकत्र करण्याची रणनीती आखली जात आहे. यादृष्टीने आगामी काळात काय काय घडामोडी घडतात यावर सगळे गणित अवलंबुन आहे. यामध्ये माजी भाजपचे आमदार शिवराम झोले, विनायक माळेकर (भाजप), शिवसेनेचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, कावजी ठाकरे (शिवसेना) या प्रमुख इच्छुकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हिरामण खोसकर यांनीही उमेदवारीसाठी भाजप- शिवसेना दोन्हीकडे उंबरे झीजवले आहेत. यामध्ये एकंदरच शिवसेना- भाजप युती झाली तरी डोकेदुखी अन्‌ नाही झाली तर इच्छुकांची परवड अशी स्थिती आहे. 

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये, क्रीडा प्रबोधिनी,स्थानिकांना रोजगार, पाण्याचे व्यवस्थापन, दुर्गम भागात आरोग्य सेवा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आदी विषय घेऊन संभाव्य उमेदवार निर्मला गावित यांना घेरणार असल्याचे संकेत आहेत.असे असले तरी ह्यासाठी गावितांकडून काम केल्याच्या पुराव्यांसह सडेतोड उत्तरे देण्याची तयारी केली आहे. 

आमदार निर्मला गावित यांनी आपल्या कार्यकाळात सर्व आश्वासनांवर काम केले असल्याचा दावा केला आहे.दोन्ही तालुक्‍यातील प्रत्येक गावात राजकारणविरहित विकास करण्यासाठी शब्द पूर्ण केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार विरोधकांकडे बोलण्यासाठी एकही मुद्दा शिल्लक नसल्याने निवडणुकीत त्यांची हवा गुल होणार आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com