निर्भया'च्या दोषींना विचारली अखेरची इच्छा, खाणे झाले कमी !

निर्भया'च्या दोषींना विचारली अखेरची इच्छा, खाणे झाले कमी !

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपींना फाशी देण्याची तयारी तिहार कारागृहात वेगाने सुरू आहे. प्रशासनाने गुरुवारी नोटीस देऊन त्यांची शेवटची इच्छा विचारली. मात्र, त्यावर आरोपींनी काय उत्तर दिले, हे समजू शकलेले नाही.
 
निर्भयाप्रकरणी पवनकुमार गुप्ता, मुकेशसिंह, विनय शर्मा आणि अक्षयकुमारसिंह या चारही दोषींना 1 फेब्रुवारीला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. तिहार तुरुंगात याची तयारी सुरू असून, आज त्यांना नोटीस बजावून त्यांची अंतिम इच्छा विचारण्यात आली. 

1 फेब्रुवारीला देण्यात येणाऱ्या फाशीपूर्वी ते शेवटचे कोणाला भेटू इच्छितात, त्यांच्या नावावर काही संपत्ती असल्यास ती कोणाच्या नावे करायची आहे, एखादा धार्मिक ग्रंथ वाचण्याची इच्छा आहे का किंवा एखाद्या धर्मगुरूंना पाचारण करायचे आहे, असे प्रश्‍न त्यांना विचारण्यात आले. जर या दोषींची इच्छा असेल तर फाशी देण्यापूर्वी त्या पूर्ण करता येतील, असेही प्रशासनाने नोटिशीत म्हटले आहे. 

तुरुंगातून देण्यात आलेल्या माहितीनुसार चारही दोषी सध्या अस्वस्थ दिसत असून, आयुष्य संपणार या भीतीने विनय शर्मा याने खाणे सोडले. मात्र, बुधवारी त्याच्यापुढे अन्न ठेवण्यात आले, तेव्हा त्यातील थोडेसे त्याने खाल्ले. पवन कुमारचे खाणे मंगळवारपासून (ता.21) कमी झाले आहे.

मुकेशसिंह आणि पवनकुमार गुप्ता यांची दिनचर्या नेहमीप्रमाणे सुरू आहे. फाशी टाळण्यासाठी जेवढे कायदेशीर पर्याय होते त्याचा वापर मुकेशसिंह याने केला आहे. त्याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. आता अन्य तिघांकडे दया याचिका करण्याचा आणि दोघांकडे सर्वोच्च न्यायालयात सुधारणा (क्‍युरेटिव्ह) याचिका दाखल करण्याचा कायदेशीर उपाय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com