ठाणे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : निरंजन डावखरे

ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्षपदी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार अ‍ॅड.निरंजन डावखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर त्यांनी ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला
Niranjay Dawkhare Became Thane District BJP President
Niranjay Dawkhare Became Thane District BJP President

शिक्रापूर : ठाणे महापालिकेची निवडणूक पुढील दोन वर्षात - २०२२ मध्ये आहे. यावेळी महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवू तो पर्यंत स्वस्थ बसणार नाही. अर्थात आजच्या नव्या जबाबदारीच्या निमित्ताने आपल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचेसह सर्व वरिष्ठ नेत्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया निवडीनंतर आमदार अ‍ॅड.निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.

ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्षपदी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार अ‍ॅड.निरंजन डावखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते.ठाणे शहर विधानसभा मतदार संघ भाजपाकडे तर ठाणे महापालिका क्षेत्रातील शेजारील अन्य तीन विधानसभा मतदार संघात अन्य पक्षांचे आमदार आहेत. विधानसभा निवडणूक भाजपा-सेनेने एकत्र लढविल्याने शिवसेना आमदारांना भाजपा संघटना जाळ्याचा मोठा लाभ झाला होता. याच पार्श्वभूमिवर येत्या काळात सर्वप्रथम ठाणे महापालिका हेच आपले लक्ष्य असून ठाणे महापालिकेवर मित्रपक्षांसह भाजपाची सत्ता येईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याची प्रतिक्रियाही अ‍ॅड.डावखरे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.

वडील डावखरे साहेबांच्या स्मृती जागल्याच..!

ठाणे शहर आणि जिल्ह्यावर दिवंगत विधान परिषेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांचा तब्बल २५ वर्षे प्रभाव राहिला. त्यांच्या पश्चात भाजपाने आपल्यावर त्याच विभागाची जबाबदारी टाकणे हे वडील डावखरे साहेबांचे पुण्य कामाला आल्यासारखे आहे. त्यांच्यामुळे राजकारणात आलो, स्थिरावलो, फडणवीस-चंद्रकांत दादा तसेच भाजपाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो असे मी आवर्जून म्हणेन, असेही यावेळी आमदार डावखरे यांनी सांगितले. 

हिव-यात फटाक्यांची आतिषबाजी..!

निरंजन डावखरे यांची ठाण्याच्या शहर-जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे समजताच हिवरे-पिंपळे (ता.शिरुर, जि.पुणे) या त्यांच्या मुळगावी फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष करण्यात आला. गावात लवकरच अ‍ॅड.निरंजन डावखरे यांचा जाहिर सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वसंतराव डावखरे प्रतिष्ठानचे संचालक दत्तात्रय तांबे व बाळासाहेब शेळके यांनी दिली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com