ठाणे शहर भाजप अध्यक्षपदी आमदार निरंजन डावखरे

नवनिर्वाचित अध्यक्ष निरंजन डावखरे यांना तीन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली 2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका लढविल्या जाणार आहेत.
Niranjan_Davkhare
Niranjan_Davkhare

ठाणे :  ठाणे शहर भाजप अध्यक्षपदी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांची आज निवड करण्यात आली. या निवडीद्वारे भाजपने तरुण व स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्याला पसंती दिली असल्याचे मानले जात आहे.


भाजपकडून शहर अध्यक्षपदासाठी अंतर्गत निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी आमदार निरंजन डावखरे यांच्याविरोधात कोणत्याही कार्यकर्त्याने अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे कोकण प्रभारी व निवडणूक अधिकारी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते निरंजन डावखरे यांना अध्यक्षपदाचे पत्र देण्यात आले. 


या वेळी आमदार संजय केळकर, मावळते शहराध्यक्ष संदीप लेले, ज्येष्ठ नगरसेवक अशोक राऊळ, भरत चव्हाण, मनोहर डुंबरे, मुकेश मोकाशी, सुनेश जोशी, नगरसेविका मृणाल पेंडसे, दीपा गावंड, कमल चौधरी, अर्चना मणेरा, कविता पाटील आदींसह भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


नवनिर्वाचित अध्यक्ष निरंजन डावखरे यांना तीन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली 2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका लढविल्या जाणार आहेत. निरंजन डावखरे यांची प्रतिमा स्वच्छ असून ते तरुण आहेत. त्यांनी बी.कॉम. व एलएल.बी. असे शिक्षण घेतले आहे. 


विधिमंडळाच्या विशेषाधिकार, आश्‍वासन आणि आदिवासी समितीबरोबरच ते डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचा ठाणे शहरात चांगला संपर्क आहे. त्याचा फायदा भाजपला होण्यासाठी अध्यक्षपदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे मानले जाते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com