एकनाथ शिंदेंनी फडणविसांना टाळले; निरंजन डावखरे चिडले..

....
एकनाथ शिंदेंनी फडणविसांना टाळले; निरंजन डावखरे चिडले..

ठाणे :  कित्येक वर्षे रखडलेला ठाण्यातील क्लस्टर (नागरी समूह विकास योजना) प्रकल्प वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आणि शिवसेनेने त्यावेळी त्यांचे अभिनंदनही केले होते. मात्र या प्रकल्पाचे खरे शिल्पकार असलेल्या फडणवीसांना पुढील दोन दिवसांत होणा-या भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेनेने का टाळले, असा जाहीर सवाल भाजपा ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेवून विचारला आहे.

मंजूर प्रकल्पातून ठाण्यातील गावठाणे व कोळीवाडे वगळणार की, नाही ते आधी जाहिर करुन दाखवा असे जाहिर आव्हानही डावखरे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना या वेळी थेट दिले.

ठाणे शहरातील एकुण २३ टक्के म्हणजेच २ हजार २९१ हेक्टर जमिन प्रत्यक्षात वापरात आणून ठाण्यात ३०० स्व्केअर फुटांची २३ हजार अतिरिक्त गृहंसंकुले उभे करण्याचे स्वप्न सत्यात आणण्याचे शिवधनुष्य वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलले आणि ही योजना मंजुर केली. त्यावेळी सर्वपक्षीय अभिनंदन करताना शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करुन मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजीही केली होती. मात्र आता या फडणवीसांच्याच कल्पनेतील योजनेच्या पुढील दोन दिवसात होणा-या भूमिपुजन कार्यक्रमाला त्यांनाच टाळल्याचे शिवसेनेचे गौडबंगाल नेमके काय आहे ते समजत नसल्याचा आरोप करीत डावखरेंसह आमदार आमदार संजय केळकर, नगरसेवक संदीप लेले, कृष्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मढवी आदींनी शिवसेनेच्या भूमिकेबद्दल जोरदार आक्षेप घेतले.

क्लस्टर प्रकल्पाच्या यूआरपीला (अर्बन रिन्यूअल प्लॅन) मंजुरी मिळालेली नसून, अद्यापी आयओडी (इंटिमेशन ऑफ डिसअॅप्रूव्हल) देण्यात आलेली नाही. त्यामुळे ई-भूमिपूजन करण्यासाठीची शिवसेनेची लगीनघाई हास्यास्पद असल्याचे आमदार डावखरे यांनी यावेळी म्हटले. दरम्यान यावेळी क्लस्टर योजना मंजुरीनंतर फडणवीसांचे अभिनंदन फलक फडकविले तेच फलक आज भाजपाच्या सर्व पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत दाखविले व शिवसेना कशी सोयिस्करपणे भाजपाला विसरते याचा पुरावाही सादर केला.

एकनाथ शिंदेंनी गावठाण-कोळीवाड्यांबाबत बोला मग मानतो...!
कुठल्याही एखाद्या मोठ्या प्रकल्पाला उभे करण्याची दूरदृष्टी शिवसेनेकडे नसल्याचा दावा करीत करीत फडणवीसांच्या कल्पनेलाच स्वत:च्या श्रेयासाठी वापरण्याची क्ल्यूप्ती शिवसेना नेत्यांची आहे. पर्यायाने योजना फडणवीसांची असली तरी या योजनेत आता ठाण्यातील गावठाण व कोळीवाडे वगळणार की, त्यांचे काय करणार याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर करायला लावा मगच तुम्हाला मानू असे म्हणत डावखरे यांनी शिंदेंना यावेळी चिमटा काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com