आमदार अनिल कदम यांची दिक्षी गावात घोड्यावरून मिरवणूक (व्हिडिओ)

निफाडमध्ये विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार, आमदार अनिल कदम यांचा प्रचार दौरा सुरु आहे. या दौ-यात दीक्षि गावात त्यांची वाजता गाजत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे हा प्रचार चर्चेचा विषय ठरला.
Shivsena Candidate Anil Kadam Election Rally on Horse
Shivsena Candidate Anil Kadam Election Rally on Horse

निफाड  : निफाडमध्ये विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार, आमदार अनिल कदम यांचा प्रचार दौरा सुरु आहे. या दौ-यात  दीक्षि गावात त्यांची वाजता गाजत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे हा प्रचार चर्चेचा विषय ठरला.

निवडणुकीच्या प्रचारात विविध फंडे वापरले जातात. चर्चेत राहण्यासाठी, आघाडी अन् प्रतिस्पर्धी उमेदवारांना संदेश देण्यासाठी विविध प्रकार नवे राहिलेले नाहीत. आमदार कदम यांना नेहमी आघाडी देणा-या निफाड मतदारसंघात दीक्षि गावातही असेच झाले. शिवसेना. भाजप महायुतीचे उमेदवार कदम प्रचाराला गेले असता  शिवसेनेचे समर्थक बँड, घोडा व मिरवणुकीच्या तयारीनैच जमले होते. त्यांचा उत्साह पाहून कदम देखील घोड्यावर स्वार झाले. वाजत गाजत ते मारूती मंदिराच्या सभागृहात गेले. तेथे त्यांचे औक्षण करण्यात आले. प्रचार सभा झाली. त्यानंतर वावी गावातही अशीच घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी भाजपचे वैकुंठ पाटील, सतीश मोरे, भास्कर बनकर, अनिल कुंदे या महायुतीच्या नेत्यांची भाषणे झाली. आमदार कदम नक्की निवडून येतील हा आत्मविश्वास आहे. यंदा ते हॅटट्रीक करतील याविषयी अजिबात संशय नाही. त्यामुळे ही प्रचाराची नव्हे तर विजयाची मिरवणूक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. मनोज सोनवणे, अशोक आहेर, माधव पवार, रामकृष्ण जगताप, देवीदास चौधरी, चिंधू चौधरी, विनायक चौधरी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com