आजचा वाढदिवस : आमदार अनिल कदम, निफाड - Niphad MLA Anil Kadam Birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार अनिल कदम, निफाड

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 जानेवारी 2018

24 जानेवारी, 2017

आजचा वाढदिवक - आमदार अनिल कदम

ओझर गटातुन जिल्हा परिषद सदस्य म्हणुन आमदार  त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ते संचालक होते. निफाड तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादक तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आक्रमक आंदोलन करणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ख्याती आहे.

आमदार अनिल कदम ग्रामीण भागाच्या वीजपुरवठा, लोडशेडींग आणि नादुरुस्त होणाऱ्या डीपी च्या प्रश्‍नावर आक्रमक काम करणारा तरुण आमदार म्हणून प्रसिध्द आहेत. 2009 आणि 2014 मध्ये निफाड मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून विधीमंडळात प्रतिनिधीत्व करीत आहेत. सध्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या अंदाज समितीचे प्रमुख आहेत. विधीमंडळात शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्महत्या, वीजेचे प्रश्‍न तसेच सामान्यांच्या समस्यांवर त्यांनी आक्रमकपणे आवाज उठवला आहे.

ओझर गटातुन जिल्हा परिषद सदस्य म्हणुन आमदार  त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ते संचालक होते. निफाड तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादक तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आक्रमक आंदोलन करणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ख्याती आहे. मतदारसंघात रस्ते, मुलभूत सुविधा, व्यायामशाळा अशी विविध कामे त्यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख