बापटांच्या सूनेसह कसब्यात नऊजण इच्छुक; पण बापटांच्या मनातील उमेदवार कोण?

बापटांच्या सूनेसह कसब्यात नऊजण इच्छुक; पण बापटांच्या मनातील उमेदवार कोण?

पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांच्यासह नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने, महेश लडकत, सरचिटणीस गणेश बीडकर यांच्यासह नऊ जण अधिकृतरित्या इच्छुक असल्याचे आज स्पष्ट झाले.

पुण्यातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती शिक्षणंत्री आशिष शेलार यांनी आज घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत असल्याने बीडकर व स्वरदा बापट मुलाखतीला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी आधीच अर्ज दिलेले आहेत, असे शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. 

नगरसेवक महेश लडकत, माजी नगरसेवक दिलीप काळोखे व अशोक एनपुरे यांनीदेखील मुलाखत दिली. बापट यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे बीडकर यांना नव्या नियुक्‍त्यांमध्ये शहर सरचिटणीस करण्यात आले आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून बीडकर इच्छुक आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी हुकलेले हेमंत रासने जोर लावून तयार आहेत. धीरज घाटे यांना संघविचारांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून संधी मिळेल, या अपेक्षेत आहेत. 

खासदार बापट यांनी सलग पाचवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या स्नुषा स्वरदा यांनी उमेदवारी मागितली आहे. बापट यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वांच्या मनातील उमेदवार कसब्यात देऊ, असे विधान केले होते. त्यामुळे बापटांच्या मनातील उमेदवार हा सर्वांचा ठरणार की सर्वांच्या मनातील उमेदवाराला बापट ग्रीन सिग्नल देणार, याची उत्सुकता राहणार आहे.  

इच्छुकांची नावे 
मुक्ता टिळक 
गणेश बिडकर 
धीरज घाटे 
महेश लडकत 
दिलीप काळोखे 
अशोक एनपुरे 
स्वरदा बापट 
हेमंत रासने 
मनिष साळुंके 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com