'मातोश्री' आता '१० जनपथ' ला शिफ्ट : निलेश राणेंचा टोला

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरुन चर्चा सुरु असतानाच माजी खासदार निलेश राणे यांनी मात्र शिवसेनेवर ट्वीटर बाण सोडणे सुरुच ठेवला आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना परत घरी जाण्यास सांगितल्यावरही निलेश राणे यांनी ट्वीटर वरुन टीका केली आहे.
Nilesh Rane Criticizes Shivsena again
Nilesh Rane Criticizes Shivsena again

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरुन चर्चा सुरु असतानाच माजी खासदार निलेश राणे यांनी मात्र शिवसेनेवर ट्वीटर बाण सोडणे सुरुच ठेवला आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना परत घरी जाण्यास सांगितल्यावरही निलेश राणे यांनी ट्वीटर वरुन टीका केली आहे. 

या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणतात......वाह!! फार मोठं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं... काँग्रेस बोलवेल तेव्हा गप चूप परत यायचं. मातोश्री आता १० जनपत दिल्लीला शिफ्ट झाली आहे. म्हणून परत जर बोलवले तर भगवे फेटे नाही तर गांधी टोपी घालून या.

या आधीही निलेश राणे यांनी शिवसेनेवर व विशेषतः सेना नेते व खासदार संजय राऊन यांच्यावरी जोरदार टिकास्त्र सोडले होते. संजय राऊत आजारपणासाठी लिलावती हाॅस्पीटलमध्ये दाखल झाल्यावर राणे यांनी हे नाटक असल्याची टिका केली होती. शिवसैनिक मारतील या भितीने राऊत रुग्णालयात दाखल झाले, असेही एक ट्वीट त्यांनी केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com