nilesh rane mocks sanjay raut for playing harmonium in lockdown | Sarkarnama

संजय राऊत यांची बोटे पेटीवरून फिरली आणि निलेश राणेंचे डोकेच भडकले

महेश जगताप
बुधवार, 25 मार्च 2020

निलेश राणे हे शिवसेनेच्या काही नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही असे अनेकदा दिसून आले आहे. 

पुणे : शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी `लाॅक डाऊन`च्या काळात आपला जुना पेटीवादनाचा जुना छंद जोपासला. त्यांची लेखणीवर हुकूमत असलेली बोटे पेटीवरही तितकिच कुशलतेने चालली. त्यांनी या पेटीवादनाचा व्हिडीओ सोशल मिडियात शेअर केला. मात्र त्यावरून भलतेच काहूर माजले.

राऊज यांचे पेटीवादन पाहून त्यांचे जुने विरोधक निलेश राणे यांचे डोके भडकले. राऊत यांच्या पेटीवादनाचा खालच्या पातळीवर जाऊन समाचार घेतला. निलेश राणे यांच्या डोक्यात गेलेल्य काही नेत्यांत राऊत यांचा वरचा क्रमांक आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही वाक्यावर किंवा कृतीवर निलेश राणे हे आपल निषेधात्मक मत नोंदवतात.

पेटीवादनावरूनही त्यांनी असेच खालच्या पातळीवरचे मत नोंदवले. खरे तर राऊतांच्या अशा कृतीलाही राणे आक्षेप का घेत असावेत, हा न कळणार प्रश्न आहे. दुसरीकडे नेटकऱ्यांनी राऊतांच्या पेटीवादनाचे कौतुक केले आहे. राऊत यांचा व्हिडीओ सरकारनामावर शेअर करण्यात आला. त्यावर अनेकांनी राऊत यांची राजकीय भूमिका आणि पेटीवादन याचा संबध जोडला. आजकालची पिढी मोबाईलशिवाय राहू शकत नाही. मात्र राऊत यांनी चांगला छंद जोपासला, असे मत व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख