फडणवीसांनी फसवणूक केली; नीतेश राणे बरसले!  - nilesh rane criticises devendra fadavnis | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांनी फसवणूक केली; नीतेश राणे बरसले! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

सरकारकडून मराठा समाजाला न्याय मिळणार का, असा प्रश्‍न निर्माण झाल्यानेच आता मराठा समाजाचा संयम सुटला आहे. उद्रेक होवून आंदोलन पेटले आहे. याला सरकारच जबाबदार आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. 

सिंधुदुर्गनगरी : सरकारकडून मराठा समाजाला न्याय मिळणार का, असा प्रश्‍न निर्माण झाल्यानेच आता मराठा समाजाचा संयम सुटला आहे. उद्रेक होवून आंदोलन पेटले आहे. याला सरकारच जबाबदार आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. 

श्री. राणे आज येथे आले होते. यावेळी मराठा समाज आंदोलनाच्या मुद्यावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात 72 हजारांची नोकर भरती होणार आहे. त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण नसल्याने तरुण-तरूणींची नोकरीची संधी हुकणार आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आंदोलनाने पेट घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना 16 टक्के आरक्षण देण्याचे सुतोवात केले आहे. त्यामध्ये 16 टक्के जागा बाजूला राखून ठेवल्या जातील असे जाहीर केले; मात्र ही निव्वळ फसवणूक आहे. आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायालयाकडे असताना 16 टक्के जागा राखून ठेवतो असे आश्‍वासन मुख्यमंत्री देतात, ही फसवणूक आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात मराठ्याचे आंदोलन तीव्र झाले आहे. या उद्रेकाला महाराष्ट्र शासन पूर्णपणे जबाबदार आहे. असे राणे म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख