नीतेश राणे उद्या सुटणार?

सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी पोलीस कोठडीची मुदत आणखी वाढविण्याची मागणी केली.
नीतेश राणे उद्या सुटणार?

सिंधुदुर्गः उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्यासह 19 जणांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

दरम्यान, आरोपींच्या जामिनअर्जावर उद्या (ता. 10) रोजी सुनावणी होणार आहे. आमदार नीतेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज मंगळवारी संपली असल्याने आमदार नितेश राणे यांच्यासह 19 आंदोलकांना दुपारी 2 वाजता कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी पोलीस कोठडीची मुदत आणखी वाढविण्याची मागणी केली मात्र नितेश राणे यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकुन आमदार नीतेश राणे यांच्यासह 19 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर लगेच उमेश सावंत व संग्राम देसाई यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून जामीन अर्जावर उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com