वैभव नाईक बोगस ,त्यांची ही शेवटची टर्म :नीलेश राणे 

vaibhav_ naik_
vaibhav_ naik_

मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात नाराजी होती. कमळ चिन्ह असते तर 25 हजारांनी त्यांचा पराभव निश्‍चित होता. आमदार म्हणून प्रत्येक गोष्टीत ते बोगस ठरले. आमदार म्हणून त्यांचा कोणताही प्रभाव नाही. एकही विषय त्यांनी मतदार संघातील सोडविलेला नाही.

पाच वर्षे फुकट त्या नेत्याची नव्हे तर मतदारांची, त्या भागाची जातात; पण दुर्दैव आहे वैभव नाईक पुन्हा निवडून आले; मात्र आता त्यांची ही शेवटची टर्म करायची असे भाजपने ठरवले असल्याचे माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

स्वाभीमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर माजी खासदार राणे हे प्रथमच भाजप कार्यालयात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर, कृष्णनाथ तांडेल, भाऊ सामंत, महेश मांजरेकर, दीपक पाटकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


राष्ट्रीय पक्षात आल्याचे आपल्याला समाधान आहे. काही कारणांमुळे विधानसभा निवडणुकीत लांब राहिलो होतो. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी शर्यत होती. यात शर्यत चांगली होती; मात्र शर्यत जिंकण्यासाठी उतरायला हवे. माझ्याबाबत अनेक अफवा पसरविण्याचे काम झाले; मात्र आता भाजपमध्ये प्रवेश झाल्याने सक्रिय झालो आहे. नारायण राणे हेच आमचे नेते आहेत. त्यामुळे यापुढे त्यांच्याच आदेशाने पक्षाचे काम चालणार आहे. 


पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्पर्धा करायची असेल तर ती विरोधकांशी करावी. आपआपसात स्पर्धा करू नका. गटातटाचे राजकारण करू नका. भाजप हा माझा शेवटचा स्टॉप असून यापुढे मरेपर्यत भाजप पक्षाचेच काम करणार असल्याचे श्री. राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.


बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. राणे म्हणाले, भाजपचे कुटुंब आता मोठे झाले आहे. सर्वजण कुटुंब म्हणून काम करणार आहोत. कणकवली मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेने बेईमानी केली आणि त्या पक्षात सगळे बेईमानच भरले आहेत. संघटना बांधणी हे रोजचे काम आहे.

ते पुढे म्हणाले, मालवणातील माझा वावर होता तो आता वाढविणार आहे. मधल्या काळात मी येथे आलो नाही; मात्र आता पुन्हा असे घडू नये म्हणून आठवड्यातील तीन दिवस मालवणात राहून सहकाऱ्यांना घेऊन चालणार आहे. सक्रियपणे भाजप वाढविण्याचे काम करणार आहे.'


राज्यात सत्ता स्थापनेवरून जी परिस्थिती उद्भवली आहे. त्यावर मी काही भाष्य करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी हे सत्ता आणतील. राज्यात महायुतीचीच सत्ता असेल याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही, ते असेही म्हणाले .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com