nilesh rane and gulabrao patil | Sarkarnama

मनसेच्याबाजुने थेट नीलेश राणे मैदानात ...

संपत मोरे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पुणे : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करा अशी मागणी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर काल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात खोचक टीका केली, त्यानंतर नीलेश राणे यांनी मनसेची बाजू घेत पाटील यांच्यावर ट्विट करून टिका केली आहे. "सेनेवाले कॉंग्रेस राष्ट्रवादीचे शेण खातात ते चालत... मला कधी कधी प्रश्न पडतो यांचे नाव याच्या बापाने गुलाब काय म्हणून ठेवलं ???' असं राणे यांनी म्हटलं आहे. 

मनसेने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करा अशी भूमिका घेतल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर खोचक टिका केली. "औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा सर्व प्रथम शिवसेनेनं मांडला होता. औरंगाबादला संभाजीनगर असं म्हटलं जावं, ही मागणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आजही शिवसैनिक हेच नाव म्हणतात. त्यामुळे आमचं उष्ट कुणी खाऊ नये ' अशा शेलक्‍या शब्दात पाटील यांनी टीका केली होती. 
मंत्री पाटील यांच्या टीकेनंतर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून पाटील यांच्यावर ,"सेनेवाले कॉंग्रेस राष्ट्रवादीचे शेण खातात ते चालत ... मला कधी कधी प्रश्न पडतो यांचे नाव यांच्या बापाने गुलाब काय म्हणून ठेवलं ???' अशा कडवट भाषेत टीका केली आहे. मनसेच्या बाजूने राणे मैदानात उतरले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख