निलेश लंके म्हणाले, राष्ट्रवादीत फूट होणार नाही!

लंके आज नगर जिल्ह्यातच होते. पारनेर तालुक्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावून सायंकाळी मुंबईला जाणार आहेत.
nilesh lanke
nilesh lanke

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार शरद पवार यांच्यासमवेत आहेत. पक्षात फूट पडणार नाही. मी शरद पवार यांच्यासोबतच असून, सायंकाळी बैठकीसाठी मुंबईला जाणार आहे, असे मत पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

राज्यात घडलेल्या अनपेक्षित घडामोडींमुळे अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे. कोणता आमदार कोणाकडे, याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. आज सकाळी पक्षाला अंधारात ठेवून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत लंके म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांच्या विचारांशी बांधील आहे. कोणी इतरत्र जाण्याचे कारण नाही. रात्रीतून झालेल्या घडामोडी आम्हाला माहिती नाहीत, मात्र यातून मार्ग निघेल, असे वाटते. शरद पवार हेच आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रश्नच येत नाही 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com