सुपे गटातील जनता 15 वर्षांपासून माझ्या पाठीशी! 

महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार भरविण्यात येईल.
सुपे गटातील जनता 15 वर्षांपासून माझ्या पाठीशी! 

पारनेर (नगर) : "सुपे गटातील जनता पंधरा वर्षांपासून माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. याही वेळी मतदानाच्या रूपात तुम्ही साथ दिली. सुप्यातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही. सुपे परिसराला विकास निधीच्या वाटपात झुकते माप देऊ,'' असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.

सुपे ग्रामस्थांतर्फे आमदार लंके यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच राजू शेख होते. 

लंके म्हणाले, "ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पोपट पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघात मी काम करणार आहे. सामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचे काम आपणास करावयाचे आहे. या भागातील जनता, तसेच विशेष करून तमाम मुस्लिम बांधव माझ्या पाठीशी उभे आहेत. मतदारसंघात पाणीयोजना करण्याचा मानस आहे. महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार भरविण्यात येईल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करीन.''  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com