बच्चू भाऊ, या सरकारमध्ये दम नाही : निलेश लंके

"शेतकरी ते ग्राहक मालांची विक्री केली, तर मधला पैसा शेतकऱ्याला मिळेल. बच्चू भाऊ, ह्या सरकारमध्ये दम नाही, दम आहे तो तुमच्यात. १९७२ पेक्षा भयंकर दुष्काळ, शेतकऱ्यांचा जाण असणारा नेता तुम्ही आहात. तुमची प्रेरणा घेवुनच मी समाजात काम करतो. मलाही संपविण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाला, पण गोरगरीब, दलीत कष्टकरी माझ्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहेत," असे प्रतिपादन पारनेर तालुक्यातील युवानेते निलेश लंके यांनी केले.
बच्चू भाऊ, या सरकारमध्ये दम नाही : निलेश लंके

निघोज (नगर) : "शेतकरी ते ग्राहक मालांची विक्री केली, तर मधला पैसा शेतकऱ्याला मिळेल. बच्चू भाऊ, ह्या सरकारमध्ये दम नाही, दम आहे तो तुमच्यात. १९७२ पेक्षा भयंकर दुष्काळ, शेतकऱ्यांचा जाण असणारा नेता तुम्ही आहात. तुमची प्रेरणा घेवुनच मी समाजात काम करतो. मलाही संपविण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाला, पण गोरगरीब, दलीत कष्टकरी माझ्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहेत," असे प्रतिपादन पारनेर तालुक्यातील युवानेते निलेश लंके यांनी केले.

निघोज येथे शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या जंगलमोती शेतकरी उत्पादन कंपनीच्या उद्घानटप्रसंगी लंके बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. लंके म्हणाले, "पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे दुःख मी पाहत आहे. त्याला कोणीही वाली नाही. तालुक्यातील नेते केवळ बड्या बाता करतात, परंतू, शेतऱ्यांसाठी कोणी प्रयत्न करीत नाहीत. हे दुःख आता पाहवत नाही. बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांचा आदर्श घेवून शेतकऱ्यांसाठी मी यापुढे काम करणार आहे."

भाकरीच्या तुकड्यासाठी शेतकरी मरतोय 
या वेळी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, "नागपूरला मेट्रो आली, शहरात पूल झाले, अरे येथे शेतकरी भाकरीच्या तुकडयासाठी मरतो आहे. हे सरकार विसरले. मतदान पवित्र मनाने करा. आशा ठेवून करू नका. ३५० कोटीचा पुतळा देशात उभा राहतो, पण औषध उपचाराला पैसे नाही म्हणून गरीबाची मुले मरत आहेत. यांचा विचार सरकार करत नाही. देशात खाणाऱ्यांचा विचार झाला पण पिकवणाऱ्यांचा झाला नाही. देव, धर्म, पंथ माना पण माझा बाप शेतकरी आहे, हे विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान वेतन, मुळ वेतन, महगाई भत्ता, घरभाडे, धुलाई भत्ता यांचा विचार केला, पण गरीबाच्या भाकरीच्या तुकडयांचा विचार झाला नाही." सैनिकाने सिमेवर मरायचं, शेतकऱ्यांनी मातीत, पण राजकीय लोकांनी राजकारणात मरावं, ही व्यवस्था राजकीय लोकांनी करुन ठेवलीय," असेही कडू म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com