nilesh baban sakate story | Sarkarnama

विश्वजीत शिरसगावच्या सरपंचांना म्हणाले, 'आपण निलेशला वाचवू शकलो नाही, याचं  दुःख वाटतंय'

संपत मोरे
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

दिवंगत नेते डॉ पतंगराव कदम हेसुद्धा दवाखाना आणि शैक्षणिक फी याबाबत त्वरीत निर्णय घ्यायचे तसाच निर्णय घेऊन विश्वजीत यांनी तोच माणुसकीचा वारसा पुढे चालवला आहे.

पुणे : सांगली जिल्ह्यातील शिरसगाव येथील तरुण निलेश बबन सकटे याचा अपघात झाल्याने त्याला भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर होती, डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. निलेशचा पहाटे मृत्यू झाला तेव्हा दवाखान्यात झालेले बिल भरायला त्याच्या कुटुंबाकडे पैसे नव्हते.

गावातील सरपंच शंकर मांडके यांनी रात्रीचाच आमदार डॉ विश्वजीत कदम यांना फोन करून परिस्थिती सांगितली तेव्हा कदम "बिलाची काळजी करू नका, मुलाच्या वडिलांना आधार द्या. निलेश वाचला नाही याच दुःख वाटतंय"असं म्हणाले.सकटे कुटुंब अतिशय गरीब, शेतमजुरी करणारे. हातावरच पोट. त्यामुळे या कुटुंबातील मुलाला दवाखान्यातील उपचारासाठी मदत करावी असे गावकऱ्यांना वाटले. गावच्या सरपंचानी पुढाकार घेत गावातून पंधरा हजार रुपये जमा केले पण बिलाची रक्कम एक लाखाच्या जवळपास होती.

ते बिल भरणे सकटे कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचे होते .मग गावातील पुढाऱ्यांनी रात्री आमदार विश्वजित कदम यांना फोन करून सगळी परीस्थिती सांगितली. तेव्हा विश्वजीत कदम हळहळ व्यक्त करत म्हणाले,"बिलाची चिंता करू नका. बिल भरू नका. पण एका उमद्या पोराला आपल्याला वाचवता आले नाही याचं दुःख वाटतंय." कदम यांनी सगळे बिल माफ केलेच पण गावातील पुढाऱ्यांना निलेशच्या वडिलांची काळजी घ्या, त्यांना सावरा अस सांगितलं.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख