निलंगेकरांनी रात्रीच उपोषण सोडवून उधळले विरोधकांचे रास्ता रोको !

आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी लातूरवरून आलेला मोठा पोलिस फौजफाटा परत गेला.
Nilangekar-&-fast.
Nilangekar-&-fast.

निलंगा  :  पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी रातोरात चक्र फिरवून धनगर समाजाचे उपोषण सोडवले . त्यामुळे  धनगर समाजाच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील  विरोधी पक्षांनी  जाहीर केलेले 'रास्तारोको आंदोलन रद्द करावे लागले.  विरोधी पक्षांना  यानिमित्ताने तोंडघाशी पडण्याची वेळ आली. शिवाय आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी लातूरवरून आलेला मोठा पोलिस फौजफाटा परत गेला. 

धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी मागील चार दिवसापासून येथील उपविभागीय कार्यालयासमोर धनगर समाजाचे झटींगराव म्हेत्रे, भगवान वरवटे, मुरधीधर अंचुळे, नामदेव काळे, संदीप वजीर, चंदर गोजरटे, लक्ष्मण होळकर या सात जणांनी उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी  16 तारखेला  उपोषणाचा चौथा दिवस असल्याने यातील तिघांची प्रकृती खालावली होती. उपोषण स्थळाच्या ठिकाणाहून भगवान वरवटे, संदीप वजीर व चंदर गोजरटे यांना निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले होते.

 उपोषणाला पाठींबा देण्यासाठी वंचित आघाडीचे नेते आण्णाराव पाटील, काँग्रेसचे युवा नेते अभय सोळूंके, माजी सभापती गोविंद शिंगाडे, शिवसेनेचे लिंबनमहाराज रेशमे, विठ्ठल अदित्य, बबन राजे, डॉ. अरविंद भातांब्रे, बालाजी लव्हे यासह आदीनी भेट दिली. याबाबत सरकारकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शनिवारी (17 )रोजी भाजप- शिवसेना वगळून विरोधी पक्षाकडून निवेदनाद्वारे रास्तारोको आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. रास्तारोको आंदोलनातून शक्तीप्रदर्शन दिसावे म्हणून रात्रीच कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आला होता.  

अनेकांनी विनंती करूनही उपोषणकर्ते उपोषण मागे घेण्यास तयार नसल्याने शासन व प्रशासकीय पातळीवर पेच निर्माण झाला होता. अखेर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर रात्री चक्रे फिरवली .निलंगेकरांनी नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे व उपविभागीय आधिकारी विकास माने यांच्यामार्फत भ्रमणध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी संपर्क  साधला . धनगर समाजाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्याकडे हा प्रश्न लावून धरून योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्न करू असे अश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिले.

 त्यांनतर  उपोषणकर्त्यानी नारळपाणी पिऊन रात्री 11 वाजता उपोषण सुटल्याचे जाहीर केले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आयोजित केलेले रास्तारोको आंदोलन स्थगित करण्याची वेळ विरोधकावर आली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी रास्तारोको आंदोलणाच्या बंदोबस्तासाठी लातूरवरून पाठवलेल्या तीन आर.सी.पी. च्या तुकड्या (75 पोलिस कर्मचारी) परत गेले. त्यामुळे धनगर सामाजाच्या उपोषणाचे राजकिय भांडवल करणाऱ्याना चपराक बसली असल्याची चर्चा कार्यकर्त्यात मोठ्या प्रमाणात रंगली . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com