लातूर अजून "निलंग्या'ला कळलेच नाही 

sambaji-patil-nilangekar.
sambaji-patil-nilangekar.

लातूर : कॉंग्रेसने लातूरचा काय विकास केला? असा प्रश्‍न आम्हाला विचारला जातो, पण लातुरकरांना हे सांगण्याची गरज नाही. विकासकामे करतो म्हणूनच आम्ही मते मागतो, हप्ते नाही असा घणाघात आमदार अमित देशमुख यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केला. लातूर काय आहे हे कळायला निलंग्याला अजून खूप वर्षे लागतील असा जोरदार टोला देखील अमित देशमुख यांनी निलंगेकरांचे नाव न घेता लगावला. भाजपकडून लातूरात दहशतीचे राजकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने बुधवारी (ता. 29) पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळावा घेतला. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवामुळे ना उमेद आणि बचावात्मक पावित्र्यात असलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा अमित देशमुख यांनी प्रयत्न केला. हार-जीत होत असते म्हणून बॅकफुटवर जाऊन खेळण्याची गरज नाही. फ्रंटफूटवर जाऊन सिक्‍सर ठोकण्यीची शिकवण आपल्याला दिवंगत विलासराव देशमुखांनी दिली आहे. पाच वर्षात केलेली विकासकामे लोकांपर्यत जाऊन सांगा, जे गेले त्यांची अजिबात चिंता करु नका, त्यांना गेल्या घरी सुखी राहू द्या अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आजी-माजी नगरसेवकांचा समाचार घेतला. 

दोन आकडी संख्या पार करता येणार नाही 

भाजपकडून शहरात विखारी प्रचार आणि दहशतीने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतले जात असल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला. बुद्धीभेद करून आमिषे दाखविली जात आहेत. यापूर्वी लातूरमध्ये असे कधी घडले नाही, ही लातूरची संस्कृती नाही त्यामुळे विकास आणि एकतेच्या जोरावर लढल्यास आपल्याशिवाय अन्य कुठल्याच पक्षाला दोन आकडी संख्या गाठता येणार नाही असा दावा देशमुख यांनी केला.

लातूरचे निलंगा करायचे का? 

भाजपचे नेते गेली पंचवीस वर्षे लातुरात राहतात. पण त्यांचे घर कुठे आहे कोणालाच माहीत नाही? ज्यांनी कधी आरती केली नाही ते परिवर्तन करायला निघाले आहेत? रेल्वेने पाणी दिल्याचे सांगितले जाते, पण रेल्वे कोणी आणली याची चर्चा होत नाही. "व्हीडीएफ'ने रेल्वेपेक्षा दीडपट पाणीपुरवठा शहराला केला ते सांगितले जात नाही. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे जनतेत जाऊन सांगितले पाहिजे. ही अस्मितेची लढाई आहे. लातूरचे निलंगा करायचे आहे का? हे ठरविण्याची आता वेळ आली आहे असे आवाहन आमदार दिलीपराव देशमुख यांनी उपस्थितांना केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com