पाणी चोरणाऱ्या आमदारांना निवडणुकीत शिक्षा द्या - संभाजीराव पाटील निलंगेकर

पाणी चोरणाऱ्या आमदारांना निवडणुकीत शिक्षा द्या - संभाजीराव पाटील निलंगेकर

लातूर : आपल्या साखर कारखान्यांना देण्यासाठी लातूरच्या हक्काचे पाणी स्थानिक आमदारांनी चोरले आहे. या पाणी घोटाळ्याची चौकशी तर झालीच पाहिजे, पण त्यांना निवडणुकीतही शिक्षाही झाली पाहिजे. येत्या 21 तारखेला भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना विजयी करून पाणी चोरणाऱ्या आमदारांना शिक्षा करा असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केले. 

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार लाहोटी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत श्री. निलंगकेर बोलत होते. लातूरला एक व्यापारी शहर अशी ओळख निर्माण करण्याचे काम येथील व्यापाऱ्यांनी केले आहे. त्याचे श्रेय कोणी घेवू नये. या व्यापाऱ्यांना देखील अडचणीत आणण्याचे काम केले गेले, पण इथले व्यापारी प्रामाणिक आहेत. शेतकऱ्यांचे पैसे तो वेळेवर देतो, पण व्यापाऱ्यांचेच पैसे अडकले आहेत. त्यांचे पैसे परत मिळतील याची जबाबदारी मी घेत आहे, असेही निलंगेकरांनी यावेळी जाहीर केले. 

लातूरकरांचे हक्काचे पाणी कोणी चोरले ? याची सर्वांना माहिती आहे. आपल्याकडे विविध घोटाळ्यांची चौकशी केली जाते. याठिकाणी पाण्याच्या घोटाळ्याची चौकशी होणे गरजेचे आहे. घोटाळ्यात दोषी असणाऱ्यांना शिक्षा दिली जाते. याठिकाणी पाण्याची चोरी करणाऱ्या आमदारांना मतदारांनी या निवडणुकीत पराभूत करून योग्य ती शिक्षा द्यावी, असे आवाहन निलंगेकरांनी शेवटी केली. 

उजनीचे पाणी आणणारच 
आगामी काळात उजनीचे पाणी आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. येत्या दोन वर्षात उजनीच्या पाणी योजनेचे काम सुरु झाले नाही तर आपण आहे त्या पदाचा राजीनामा देवू इतकेच नाही तर लाहोटी देखील आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सांगून निलंगेकर यांनी लातूरच्या विकासाला गती देण्यासाठी लाहोटी यांना विजयी करण्याचे आवाहन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com