मुख्यमंत्र्यांचा विधानाचा शिर्डीकरांनी गैरसमज करून घेऊ नये!

nilam-gorhe
nilam-gorhe

शिर्डी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीबाबत केलेल्या विधानाबाबत शिर्डीकरांनी गैरसमज करून घेऊ नये. आपण शिर्डीकरांच्या भावना त्यांचा कानी घातल्या. येत्या आठ दिवसांत ते शिर्डी व पाथरीच्या ग्रामस्थांसोबत चर्चा करून दोघांचे समाधान होईल, असे निर्णय घेतील. त्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन शिर्डीकरांनी उद्याचा बंद स्थगित करावा, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी केले.

त्यांनी याबाबतची चित्रफित शहरातील काही निवडक ग्रामस्थ, पदाधिकारी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पाठविली. त्यात त्यांनी वरील आवाहन केले. स्थानिक शिवसेना नेत्यांनी या चित्रफितीसोबत प्रसिद्धीपत्रक वितरित केले. या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. निलम गोऱ्हे यांनी या वादावर तोडगा निघावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे माजी न्यायमूर्ती व पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणी केली. या समितीस तीन महिन्यांची मुदत देऊन साई जन्मस्थानाबाबत निवाडा करण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे. जन्मस्थानाच्या मुद्यावरून भाविकांत गैरसमज पसरत आहेत. जन्मस्थान हा भाविकांच्या आस्थेचा विषय असला, तरी त्यात बऱ्याच गोष्टी पुरातत्त्व विभागाशी संलग्न आहेत. शिर्डी आणि पाथरी ग्रामस्थांची बैठक घेऊन दोन्ही ठिकाणचा विकास होण्यासाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा उपसभापती गोऱ्हे यांनी या पत्रकात व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी ते विधान मागे घ्यावी
निवृत्त न्यायमुर्ती व पुरातत्त्व विभागाच्या तज्ञांची समिती नेमून या वादावर तोडगा काढण्याचा पर्याय विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सुचविला असला, तरी त्यास आज शिर्डीकरांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. साईचरित्र हा प्रमाण ग्रंथ आहे. त्यात बाबांनी कधीही आपल्या जन्मस्थळाचा, धर्म व जातीचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आम्हाला समिती नेमण्याचा तोडगा मान्य नाही. मुख्यमंत्र्यांनी पाथरीबाबत केलेले  वादग्रस्त विधान मागे घ्यावे. साईजन्म भुमी म्हणून पाथरीचा उल्लेख कुणीही करू नये. तेथील साईमंदिराला निधी देण्यास आमचा विरोध नाही, अशी भुमिका आज ग्रामस्थांनी जाहीर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com