कॉंग्रेसचा हा नेता म्हणतो "नाईट लाईफ' हा शब्द चुकीचा ! 

 कॉंग्रेसचा हा नेता म्हणतो "नाईट लाईफ' हा शब्द चुकीचा ! 

नाशिक ः मुंबईत नाईट लाईफ हा शब्द चुकीचा. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. तेथे चोविस सेवा उपलब्ध व्हावी ही मूळ संकल्पना आहे. त्याचा विचार सुरु आहे असे राज्याचे वैद्यकीय व उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी आज ते येथे आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या मुंबईत नाईट लाईफच्या मुद्याकडे लक्ष वेधले असता देशमुख म्हणाले, की यासंदर्भात गोंधळ होतो आहे. जेथे जगातून पर्यटक, नागरिक, व्यवसायिक व पाहुणे या शहरात येत असतात. हे शहर चोवीस तास चालणारे शहर आहे. तेथे आवश्‍यक सेवा सतत उपलब्ध असायला हव्यात. मात्र "नाईट लाईफ' या विषयाच्या अनुषंगाने चुकीचा शब्दप्रयोग होत आहे. 

मुंबईत 24 तास सेवा उपलब्ध व्हावी ही मूळ संकल्पना आहे. पर्यटन, व्यापार 24 तास सुरु असतो. त्यादृष्टीने मुंबईसाठी ही संकल्पना आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल असा आक्षेप घेतला जात आहे. हा प्रश्‍न सगळीकडेच आहे. 

दिल्ली निवडणुकीसंदर्भात "भाजप'च्या प्रचाराविषयी ते म्हणाले, दिल्लीच्या निवडणुकांना अनुषंगून भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांचा पंतप्रधान व भाजप नेत्यांच्या स्वरुपातील मॉर्फ व्हीडीओ व्हायरल केला आहे. हा व्हायरल व्हीडीओ चुकीचा आहे. प्रचारात त्याचा असा उपयोग करणे अयोग्य आहे. निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com