nextg chief minister shivsena | Sarkarnama

"एनडीए'तून बाहेर पडल्यास शिवसेनेला मिळू शकते मुख्यमंत्रिपद 

उमेश घोंगडे 
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पुणे : कॉंग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवायचे असेल तर भारतीय जनता पार्टीसोबत असलेले नाते तोडावे लागेल. त्यासाठी केंद्रातील सत्तेतून बाहेर पडावे लागेल. या कॉंग्रेस-राष्ट्रवादीने घातलेल्या अटीमुळे शिवसेनेची मोठी अडचणी झाली आहे.परिणामी मुख्यमंत्रीपदाचे शिवसेनेचे स्वप्न तूर्तास अपूर्ण राहण्याची शक्‍यता आहे. 

पुणे : कॉंग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवायचे असेल तर भारतीय जनता पार्टीसोबत असलेले नाते तोडावे लागेल. त्यासाठी केंद्रातील सत्तेतून बाहेर पडावे लागेल. या कॉंग्रेस-राष्ट्रवादीने घातलेल्या अटीमुळे शिवसेनेची मोठी अडचणी झाली आहे.परिणामी मुख्यमंत्रीपदाचे शिवसेनेचे स्वप्न तूर्तास अपूर्ण राहण्याची शक्‍यता आहे. 

एकिकडे पडद्यामागून भाजपाबरोबर चर्चा सुरू ठेवायची त्याचवेळी राष्ट्रवादी व कॉंग्रेसबरोबरच बोलणी सुरू ठेऊन कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्याची शिवसेनेची योजना आहे. मात्र, कॉंग्रेसने भाजपाची साथ सोडण्याची घातलेली अटी अद्याप शिवसेनेच्या पचनी पडत नाही. आयोध्येतील राम मंदीराचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राम मंदीराच्या प्रश्‍नावर शिवसेना सुरवातीपासून आग्रही आहे. त्यामुळे या प्रश्‍नावर परस्पर दोन विरोधी टोकावर असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र कसे येणार हा प्रश्‍न आहे. 

शिवसेना व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने ते अडचणीचे आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत झालेली नेमकी चर्चा बाहेर येत नाही. मात्र, भाजपाशी संपूर्ण संबंध तोडा अशी कॉंग्रेसची प्रमुख अट असल्याचे सांगण्यात येत असल्याने या बाबत नेमका काय निर्णय घायचा ही शिवसेनेसमोरची अडचण आहे. कॉंग्रेसबरोबर जाण्यावरून शिवसेना आमदारांमध्ये दोन गट आहेत. 

काहीही करून मुख्यमंत्रीपद मिळवाच असा आग्रह धरणारा तर कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यात पक्षाचे दिर्घकालीन नुकसान होईल. त्यामुळे केवळ मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्यापेक्षा भाजपावर दबाव आलेला आहे. त्याचा फायदा घेऊन महत्वाच्या खात्यासह समान मंत्रीपदे सन्मानाने पदरात पाडून घ्यावीत, व्यवहारी विचार मांडणारा एक गट पत्रात आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर उद्यापर्यंत शिवसेनेला कोणती तरी एक भूमिका शिवसेनेला घ्यावी लागणार आहे. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख