next home minister anil deshmukha | Sarkarnama

पवार, वळसे-पाटील यांच्यानंतर अनिल देशमुखांचे नाव 

उमेश घोंगडे 
सोमवार, 30 डिसेंबर 2019

पुणे ; मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतरही खातेपाटपाचा "सस्पेन्स' कायम आहे. दोन दिवसात खातेवाटप जाहीर होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले. मात्र, गृह खात्यावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून अजित पवार, दिलीप वळेस-पाटील यांच्याबरोबरच अनिल देशमुख यांचे नाव आता पुढे आले आहे. 

स्वत:कडे गृहमंत्रीपद असावे अशी अजित पवार यांची इच्छा आहे. मात्र, पक्ष त्यांना ते सहजासहजी मिळू देईल असे दिसत नाही. गृहमंत्रीमद शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे देण्यात येणार असून अजित पवार यांच्याऐवजी वळसे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा रविवारी होती. आज दुपारी अनिल देशमुखांच्या रूपाने या नावात आणखी भर पडली. 

मात्र, कोणत्याच नावावर शिक्कामोर्तब झाले नसल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना गृहमंत्रीपद माझ्याकडेच येणार असल्याचा उल्लेख अजित पवार यांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर पवार यांनाच गृहमंत्रीपद मिळेल, असे वाटत असताना वळसे-पाटील व अनिल देशमुख यांची नावे पुढे आली आहेत.

 या संदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात नेमके काय आहे. याचा अंदाज कोणत्याच नेत्याला लागत नाही. वेगवेगळ्या नावावर चर्चा होत असली तरी शेवटी पवार हेच याबाबत अंतीम निर्णय घेतील, असे या सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख