next cm will be shivsainik udhav thackrey | Sarkarnama

शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई : आता पर्यंत आपण पालखीचे भोई होतो... आता यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही... तर आता मी त्याच पालखीत शिवसैनिकाला बसवल्याशीवाय रहाणार नाही असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. 

सत्तास्थापनेच्या हालचाली गतीमान झाल्याअसून भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार की नाही हे चारपर्यंत समजेल. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली असून पक्षाचे एक नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, की आमची पुन्हा चार वाजता बैठक होणार असून यावेळी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.

या निर्णयानंतर महाराष्ट्रातील जनतेला आम्हाला काय सांगायचे आहे ते सांगणार आहोत. एकीकडे भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार की नाही याकडे लक्ष लागले असताना दुसरीकडे शिवसेनाही प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 

मुंबईमध्ये मालाडच्या ज्या रिट्रिट हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांचा मुक्काम आहे तेथे आज उद्धव ठाकरे यांनी जावून आमदारांची भेट घेतली. आमदारांना मार्गदर्शन करताना ते आक्रमक झालेले दिसले. ते म्हणाले, की आता पर्यंत आपण पालखीचे भोई होतो... आता यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही... तर आता मी त्याच पालखीत शिवसैनिकाला बसवल्याशीवाय रहाणार नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख