राष्ट्रवादीच्या 'याच' भूमिकेमुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार : पाचर्णे

राष्ट्रवादीच्या 'याच' भूमिकेमुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार : पाचर्णे

शिक्रापूर : ’शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून राष्ट्रवादीने घेतलेला पुढाकार हीच बाब भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. अर्थात हे कसे घडणार ते वेळच ठरवेल..’ असे म्हणत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी निवडणूकीनंतर पहिल्यांदाच राजकीय वक्तव्य केले.

पक्षसंघटनेसह पक्षाच्या बांधणीसाठीची मोठी जबाबदारी पक्षाने आपल्यावर सोपविल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. भारतीय जनता पार्टीने आज पहिल्यांदाच राज्यातील पराभूत भाजपा आमदारांची बैठक आज मुंबईत घेतली. या बैठकीसाठी माजी आमदार पाचर्णे यांनाही निमंत्रित केले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी यांची आज पुण्यात बैठक झाल्याने पाचर्णे मुंबईत गेले नाहीत. 

याच पार्श्वभूमिवर त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, भाजपाचे १६३ पैकी १०५ आमदार विजयी होणे हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे यश आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत कोण कसे जिंकले, कसे राजकारण फिरले, काय-काय गणिते मांडून हमखास विजयी होणारे भाजपाचे आमदार पडले याचे विश्लेषन पक्षपातळीवर सुरू आहे.

मात्र आपली आमदार संख्या किती आणि मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याची वस्तुस्थिती माहिती असतानाही विचारधारा बदलून शिवसेनेचा मुख्यमंत्री करायला निघालेल्या पक्षांची तडजोडवृत्ती हीच आगामी काळात भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी कारणीभूत ठरणार असून तो काळ फार दूर नसल्याचेही श्री पाचर्णे यांनी सांगितले.     
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com