न्यूज -18 च्या एक्झिट पोलमध्ये अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे , नवनीत राणा  अडचणीत

एक्झिट पोल हा अंदाज असतो . मी नांदेडमधून शंभर टक्के जिंकणार आहे . येत्या २३ तारखेला ते स्पष्ट होईल असे अशोक चव्हाण यांनीन्यूज -18 शी बोलताना सांगितले .
shinde--Navneet-chavan
shinde--Navneet-chavan

पुणे : न्यूज -18  आणि आयपीएसओएस  यांनी मिळून एक्झिट पोल  केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील  एक्झिट पोलमध्ये  काँग्रेसचे अशोक चव्हाण ( नांदेड ), सुशीलकुमार शिंदे (सोलापूर) , राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणा अमरावतीत अडचणीत असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे . 

सोलापुरात वंचित आघाडीमुळे सुशीलकुमार शिंदे अडचणीत आल्याचे नमूद केले असून  वंचित आघाडीमुळे शिवसेना - भाजप युतीला मोठा फायदा होईल, असे भाकीत या  एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आले आहे . 

विदर्भात भाजप - शिवसेना युतीला चांगल्या जागा मिळतील तर नितीन गडकरी जिंकण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये व्यक्त होते आहे . 

न्यूज -18 च्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांना अकोला आणि सोलापूर अडचणीत असल्याचे दाखवले आहे . 

 एक्झिट पोल हा अंदाज असतो . मी नांदेडमधून शंभर टक्के जिंकणार आहे . येत्या २३ तारखेला ते स्पष्ट होईल असे अशोक चव्हाण यांनी  न्यूज -18 शी बोलताना सांगितले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com