न्यूज -18 च्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजप- शिवसेना41 जागांचे भाकीत 

माझा एक्झिट पोलवर आणि गॉसिपवर विश्वास नाही . या एक्झिट पोलचा आधार घेऊन हजारो ईव्हीएम मशीन बदलण्याचा भाजपचा डाव आहे .-मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ,पश्चिम बंगाल
thakrey_Fadanvis
thakrey_Fadanvis

पुणे : न्यूज -18  आणि आयपीएसओएस  यांनी मिळून एक्झिट पोल  केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे.  महाराष्ट्रातील  एक्झिट पोलमध्ये  भाजप- शिवसेनेला 41 जागांचे असे भाकीत वर्तविण्यात आले आहे . 

 न्यूज -18  आणि आयपीएसओएस यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 21 ते 23 जागा मिळतील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे .  शिवसेनेला 20 ते 22 जागा मिळतील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे . काँग्रेसला 4 ते 6 जागा आणि राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळेल असे भाकीत वर्तविण्यात आले आहे . 

विदर्भात भाजप - शिवसेना युतीला चांगल्या जागा मिळतील तर नितीन गडकरी जिंकण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये व्यक्त होते आहे . 

मुंबई शहरातील सर्व सहाही जागा शिवसेना भाजप युती जिंकेल असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे . 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असे म्हंटले आहे की , माझा एक्झिट पोलवर आणि गॉसिपवर विश्वास नाही . या एक्झिट पोलचा आधार घेऊन हजारो ईव्हीएम मशीन बदलण्याचा भाजपचा डाव आहे . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com