New Standing Committe Chairperson of PCMC streamlining the work | Sarkarnama

पिंपरी पालिकेत 'स्थायी'ची शिस्तीची छडी

उत्तम कुटे
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पालिकेतील नवे सत्ताधारी व नवीन स्थायीचा पहिल्या बैठकीपासून शिस्तबद्ध आणि कडक कारभार सुरू झाला आहे.वाढीव खर्च आणि मुदतवाढीला त्यांनी चाप लावला आहे.त्यांच्यामुळे आयुक्त दिनेश वाघमारे हे सुद्धा गणवेशात स्थायीच्या बैठकीला व कधी नव्हे,ते त्यानंतरच्या पत्रकारपरिषदेलाही हजर राहू लागले आहेत. अजेंड्यावरील टक्केवारीचे आणि संशयास्पद विषय नवी स्थायी स्थगित करू लागली आहे. तर, काही विषय थेट दफ्तरी दाखल करण्यास त्यांनी सुरवात केली आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीने व त्यातही समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी "आधी केले, मग सांगितले' या उक्तीनुसार शिस्तशीर व प्रामाणिक कारभार सुरू केल्याने प्रशासन ताळ्यावर आले असून ते सुतासारखे सरळ होऊ लागले आहे. त्यांना समिती सदस्या आशा शेंडगे यांची तेवढीच मोलाची साथ मिळाल्याने आता किमान वर्षभर,तरी पालिकेचा गाडा सुरळीत चालणार आहे.या दोघी "एस' रणरागिणींनी पारदर्शक कारभाराच्या शिस्तीची छडी
उगारल्याने आतापर्यंत टक्केवारीने काम करणाऱ्या ठेकेदारांचे आणि
त्यांच्याशी मिलीभगत असणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

महापालिकेत भाजप प्रथमच सत्तेत आला असून त्यांनी पहिल्या दिवसापासून काही नवे व चांगले पायंडे पाडले आहेत. सावळे यांच्यासह सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना पदाधिकारी म्हणून मिळालेली पालिकेची मोटार घेतलेली नाही. तर, यापूर्वीच्या राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात विरोधी बाकावर असलेल्या शिवसेनेच्या सावळे व शेंडगे या दोघींनी राष्ट्रवादीची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली.नंतर त्या भाजपमध्ये गेल्या. आता त्यांच्या हातात (इतरही 14 स्थायी समितीसदस्य) पालिका खजिन्याची चावी आहे.

मात्र, हा खजिना वारेमापपणे खर्च न करता एकेक रुपयाचा योग्य विनियोग करण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून त्यांनी अनावश्‍यक खर्चाला कात्री लावली आहे. शेडगे या शिक्षिका असल्याने त्यांच्यात शिस्त अंगभूतच आहे. मात्र,डॅशिंग सावळे यांच्या तशा कारभारामुळे अल्पावधीतच त्या स्थायीच्या हेडमास्टर (अध्यक्षा) म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. पालिका व पर्यायाने स्थायीत बहुमत असल्याने त्यांना आपल्या पद्धतीने काम करणे सहजसोपेही जात आहे.

पालिकेतील नवे सत्ताधारी व नवीन स्थायीचा पहिल्या बैठकीपासून शिस्तबद्ध आणि कडक कारभार सुरू झाला आहे.वाढीव खर्च आणि मुदतवाढीला त्यांनी चाप लावला आहे.त्यांच्यामुळे आयुक्त दिनेश वाघमारे हे सुद्धा गणवेशात स्थायीच्या बैठकीला व कधी नव्हे,ते त्यानंतरच्या पत्रकारपरिषदेलाही हजर राहू लागले आहेत. अजेंड्यावरील टक्केवारीचे आणि संशयास्पद विषय नवी स्थायी स्थगित करू लागली आहे. तर, काही विषय थेट दफ्तरी दाखल करण्यास त्यांनी सुरवात केली आहे.

त्यामुळे पालिकेचा अनावश्‍यक खर्च वाचू लागला आहे. त्यामुळे टक्केवारी देऊन पालिका अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याशी संगनमत करून आतापर्यंत कामाचे ठेके घेणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. स्थायीच्या बैठकीपूर्वी या समितीचे दालन व परिसरात त्यांचा वावर थांबला आहे.

तुकड्यातुकड्यांनी विषय स्थायीसमोर मंजुरीसाठी आणण्यामागील समीकरणही त्यांनी उलटे केले आहे. अपूर्ण व अर्धवट माहिती देत समितीकडून विषय मंजूर करून घेण्याचा सपाटा नव्या समितीने व त्यातही सावळे व शेंडगे या दोघी "एस'नी थांबविला असून अशा कामांना त्यांनी "नो' म्हणण्यास (स्थगित वा नामंजूर) सुरवात केली आहे. त्याचा प्रत्यय 12 एप्रिलला झालेल्या स्थायीच्या बैठकीत आला.

 

नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीच्या व्हिडिओ शुटिंगचे काम काळेवाडी येथील राहुल फोटो स्टुडिओला देण्यात आले होते. हा विषय मंजुरीसाठी न समजेल व कळेल अशा पद्धतीने अर्धवट अजेंड्यावर (विषय क्र.35) ठेवण्यात आला होता. मात्र, चाणाक्ष शेडगे यांनी तो स्थगित ठेवला. निवडणूक काळात दरदिवशी 1258 रुपये या कामासाठी देण्यात येणार होते. मात्र, 1980 दिवसांसाठी हे शुल्क लावण्यात आल्याचे व त्या दिवसांसाठी 25 लाख रुपये देण्याचा हा विषय असल्याचे कळताच तो थांबविण्यात आला. निवडणुकीचा कालावधी जास्तीत जास्त 45 दिवसांचा धरला,तरी प्रत्यक्षात
त्यापेक्षा कितीतरी अधिकपट म्हणजे पाच वर्षे हे काम केल्याचे दाखवून पालिका खजिना खाली करण्याचा हा डाव हाणून पाडण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख