सतेज पाटील यांच्या जबाबदारीत वाढ

...
satej patil
satej patil

कोल्हापूर ः गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबरोबरच तीन जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी आज पक्षाच्यावतीने निवड करण्यात आली. या निवडीने त्यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे.

गेल्यावर्षी श्री. पाटील यांची कॉंग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली होती. राज्यात भाजपाचे सरकार जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन पक्षाचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आले. नव्या सरकारमध्ये श्री. पाटील यांची वर्णी गृहराज्यमंत्री पदावर लागली.

कॉंग्रेसचे संघटन मजबूत करण्याबरोबरच सरकार व जनतेत सुसंवाद वाढवण्यासाठी कॉंग्रेसच्या बाराही मंत्र्यांना काही जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यात श्री. पाटील यांच्याकडे सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याची संपर्कमंत्री या नात्याने जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबरोबरच तीन जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदाचेही त्यांना काम करावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com