new office bearers for MNS | Sarkarnama

वसंत मोरे, किशोर शिंदे आणि संभूस आता मनसेचे सरचिटणीस

उमेश घोंगडे
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज झालेल्या गुरू पोर्णिमा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर मनसेच्या उर्वरित नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. पक्षाचे महापालिकेतील गटनेते वंसत मोरे, माजी नगरसेवक किशोर शिंदे व हेमंत संभूस यांना राज्य सरचिटणीस करण्यात आले आहे. प्रशांत कनोजिया व अशिष साबळे यांना विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. या शिवाय वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली. 

सर्व पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी नेमणुकींची पत्रे आज सकाळी दिली. नव्या नेमणुकांनंतर पक्षाची शहरातील संघटना अधिक जोमाने कामाला लागेल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सुशिला नेटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसंत फडके व सुधीर भदे यांच्याकडे अनुक्रमे राज्य सचिव व जिल्हा संघटकपद देण्यात आले आहे.

या शिवाय कैलास दांगट यांच्याकडे जनहित कक्षाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. माजी नगरसेवक अनिल राणे यांच्याकडे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्षपद देण्यात आले. विशाल शिंदे यांच्याकडे जनाधिकार सेनेच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. ऋषी सुतार यांना माथाडी कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर संजय भोसले यांच्याकडे पर्यावरण विभागाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. योगेश खैरे व संतोष पाटील यांच्याकडे संघटना समन्वयाचे सचिवपद देण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख