नवी मुंबईवर आता "सीसीटीव्ही' चा वॉच 

नवी मुंबईवर आता "सीसीटीव्ही' चा वॉच 

नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपले वजन वापरून आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईसाठी 1 हजार 493 सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करून घेतले आहेत. यामुळे नवी मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीला लवकरच आळा बसणार आहे. येथील शाळा, उद्याने, मुख्य रस्ते, महत्वाची ठिकाणे या सीसीटीव्हीच्या नजरेखाली येणार आहेत. 

म्हात्रे यांनी यासाठी पुढाकार घेऊन सरकारकडून 1 हजार 493 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. त्यातच आपल्या आमदार निधीतूनही त्या 100 हुन अधिक कॅमेरे लावणार असल्याने नवी मुंबईत महिलांची सुरक्षा आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा बसणार आहे. नवी मुंबईत महिलांच्या सुरक्षेसोबतच वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून 1493 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या प्रस्ताव मंजूर करून घेतला अशी माहिती म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय आपल्या आमदार निधीतून 100 हून अधिक वेगळे सीसीटीव्ही कॅमेरे हे बेलापूर व ऐरोली मतदार संघात लावली जाणार आहेत. त्याशिवाय ज्या ठिकाणी गरज आणि नागरिकांची मागणी असेल त्या ठिकाणी अधिकचे सीसीटीव्ही हे आपल्या आमदार निधीतुन लावले जातील अशी माहितीही त्यांनी दिली. 

नवी मुंबईत लावण्यात येणार हे सीसीटीव्ही कॅमेरे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली असतील. यात सिडको प्रशासन आणि नवी मुंबई महापालिका यांचे सहकार्य लाभणार आहे. हे कॅमेरे नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये, उद्याने, बस डेपो, रेल्वे स्टेशन, गजबजलेले चौक, सरकारी कार्यालये, बाजार, मंडई, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी लावले जाणार आहेत. 

नवी मुंबईत लावण्यात येणाऱ्या सर्व सीसीटीव्ही कॅमेरेची देखभाल आणि त्याचा खर्चही राज्य सरकार उचलणार आहे. तर आवश्‍यक वाटेल त्या ठिकाणी आपण आमदार निधीतून खर्च करून ते सुरू ठेवले जातील, त्याची देखभालही केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com