मुंबईतून परतताच आमदार रमले मतदारसंघात; लग्नकार्य, धार्मिक सोहळ्यांना हजेरी - new mla and public contact | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईतून परतताच आमदार रमले मतदारसंघात; लग्नकार्य, धार्मिक सोहळ्यांना हजेरी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

औरंगाबाद : पहिल्यांदाच निवडून आलेले आणि राज्यातील सत्तापेचामुळे मुंबईत अडकून पडलेले आमदार आता आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. महिनाभरापासून जनतेशी संपर्क नसल्यामुळे मतदारसंघात पोहचताच आमदारांनी लोकांच्या भेटीगाठी, धार्मिक सोहळ्यांना उपस्थिती आणि लग्नकार्यात वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी धाव घेतांना दिसत आहेत. 

औरंगाबाद : पहिल्यांदाच निवडून आलेले आणि राज्यातील सत्तापेचामुळे मुंबईत अडकून पडलेले आमदार आता आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. महिनाभरापासून जनतेशी संपर्क नसल्यामुळे मतदारसंघात पोहचताच आमदारांनी लोकांच्या भेटीगाठी, धार्मिक सोहळ्यांना उपस्थिती आणि लग्नकार्यात वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी धाव घेतांना दिसत आहेत. 

विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा गेल्या महिनाभरापासून सुटत नव्हता. भाजपशी युती तुटल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला होता. फोडाफोडी आणि घोडेबाजाराची शक्‍यता लक्षात घेता या तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईत बोलावून घेतले होते. त्यामुळे महिनाभरात क्वचितच आमदारांना आपल्या मतदारसंघात थांबण्याची संधी मिळाली. 

जिल्ह्यातील वैजापूर आणि कन्नड या मतदारसंघातून अनुक्रमे प्रा. रमेश बोरणारे आणि उदयसिंह राजपूत हे दोघे पहिल्यादांच निवडून आले. त्यामुळे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सुरुवातीच्या चार-पाच दिवसांत या नवनिर्वाचित आमदारांनी आपल्या मतदारसंघात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या पंचनाम्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासाही दिला. पण त्यानंतर लगेचच पक्षाच्या आदेशानुसार त्यांना मुंबईत जावे लागले. मुंबईतील हॉटेलात त्यांच्या मुक्काम असल्यामुळे तिथूनच मतदारसंघात संपर्क साधून ते आढावा घेत होते. सत्ता स्थापनेचा संघर्ष शिगेला पोचल्यावर तर शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलच्या बोहर पडण्यास देखील मज्जाव करण्यात आला होता. परंतु आता राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन उध्दव ठाकरे यांच्यासह काही निवडक मंत्र्यांनी शपथ देखील घेतली आहे. 

विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव पास होऊन राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर विशेष अधिवेशन संपले आणि मतदारसंघाची ओढ लागलेले आमदार रात्रीच मुंबईतून निघाले. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरणारे यांनी मतदारसंघात पोचताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी, धार्मिक सोहळ्यांना हजेरी लावत जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला. तर कन्नडचे उदयसिंह राजपूत यांनी देखील मतदारसंघातील समस्या, शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांचा आढावा घेत नागरिकांच्या भेठीगाठीवर भर दिल्याचे दिसून आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख