नव्या सत्ताधाऱ्यांना विधानपरिषदेच्या बारा आमदारांची बंपर लॉटरी लागणार...

नव्या सत्ताधाऱ्यांना विधानपरिषदेच्या बारा आमदारांची बंपर लॉटरी लागणार...

मुंबई : राज्यात सत्तास्थापन करणा-या राजकीय पक्षांना राज्यपाल नामनियुक्‍त तब्बल 12 आमदारांची बंपर लॉटरी लागणार आहे. तसेच बदललेल्या राजकीय समिकरणामुळे पुढील पाच वर्षात होण-या विधानपरिषदेतील विविध निवडणुकांमध्येही चांगला फायदा होणार आहे. राज्यात सध्या सत्तास्थापन्याचा तिढा कायम असला तरी काही दिवसातच सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणा-या भाजपने अद्यापपर्यंत सत्तेचा प्रयत्न सोडला नाही. पडद्याच्या पाठीमागे भाजपने आमदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. 

दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची नवीन आघाडी आकारास येत आहे. या तीन पक्षांकडून लवकरच सत्तास्थापन करण्याचा दावा करण्यात येणार आहे. येत्या दोन तीन दिवसातील घडामोडीनंतर हे तीन पक्ष सत्ता स्थापन्याचा दावा करणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, जो पक्ष राज्यात सत्तास्थापन करेल त्याला विधानपरिषदेतील संख्याबळ वाढविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. येत्या 24 एप्रिल 2020 रोजी राज्यपाल नामनियुक्‍त बारा जागा रिक्‍त होत आहे. या जागा भरण्यासाठी सरकार उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपविण्याची पद्धत आहे. म्हणजेच सत्ताधारी पक्षाला हे आमदार आयतेच मिळत असतात. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येकाच्या वाटयाला यातील तीन आमदार मिळू शकतात. 

पुढील पाच वर्षात होणाऱ्या विविध निवडणुकीतही सत्ताधा-यांच्या पारडयात अधिकच्या जागा पडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. 
पाच वर्षात होणा-या रिक्‍त जागांवरील अन्य निवडणुका 
1. जुलै आणि ऑगस्ट 2020 : 6 जागा 
औरंगाबाद तथा जालना स्थानिक स्वाराज्य संस्था, औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि पुणे शिक्षक 
2. 24 एप्रिल 2020 : 9 जागा 
विधानसभा सदस्यातून निवडून द्यावयाच्या जागा - यात कॉंग्रेसच्या 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस 3, भाजपा 2 तर शिवसेनेच्या 1 जागेचा समावेश आहे. 
3. 24 एप्रिल 20120 : 12 जागा 
राज्यपाल नामनियुक्‍त - यात कॉंग्रेसच्या 5, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 6 तर पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जागेंद्र कवाडे यांचा समावेश आहे. 
.......................... 
जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत रिक्‍त होणा-या जागा : 15 जागा 
1. स्थानिक प्राधिकारी संस्था - मुंबई महापालिका 2, सोलापूर, कोल्हापूर,धुळे नंदूरबार, अकोला बुलढाणा, अहमदनगर, नागपूर,ठाणे,जळगाव, सातारा-सांगली,नांदेड,यवतमाळ,पुणे,भंडारा-गोंदिया स्थानिक संस्थांमधून प्रत्येकी 1 जागा 
2. विधानसभा सदस्यातून निवडून द्यावयाच्या जागा : 10 जागा 
सात भाजपच्या 6, राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन तर शिवसेनेच्या 2 जागांचा समावेश 
3. शिक्षक मतदारसंघ : 3 जागा 
औरंगाबाद,नागपूर आणि कोकणातील प्रत्येकी एका जागेचा समावेश 
4. पदवीधर मतदारसंघ : 2 जागा 
अमरावती आणि नाशिक विभाग 
.............................. 
31 मे ते जुलै 204 पर्यंत होणा-या निवडणुका 
1. स्थानिक स्वराज्य संस्था : 6 जागा 
रायगड-सिंधुदुर्ग-रत्नागिरी स्थानिक संस्था, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड 
2. पदवीधर - 2 जागा 
मुंबई आणि कोकण विभाग 
3. शिक्षक - 2 जागा 
नाशिक आणि मुंबई विभाग 
4. विधानसभा सदस्यातून निवडून द्यावयाच्या जागा ः- 11 जागा 
यात कॉंग्रेसच्या 2, राष्ट्रवादी कॉंग्रेस 1, शिवसेना 2, भाजपा 4, रासपा 1 आणि शेकाप 1 जागांचा समावेश 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com