for new maharashtra i fight election aditya thackrey | Sarkarnama

नवा महाराष्ट्र घडविण्यासाठीच मी निवडणुक रिंगणात : आदित्य ठाकरे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

घोटी : "मी महाराष्ट्रभर फिरतोय. समस्या कोण सोडवेल यासंदर्भात लोकांना फक्त शिवसेनेचीच खात्री वाटते. त्यादृष्टीने नाव महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठीच मी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेनेला खंबीरपणे साथ द्या असे आवाहन युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले. 

विधानसभा निवडणुक प्रचारासाठी नाशिकमध्ये ठाकरे यांची पहिली सभा इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघाच्या उमेदवार, आमदार निर्मला गावित यांच्यासाठी घोटी येथे झाली. यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केले. या मेळाव्यापूर्वी शिवसेनेतर्फे शहरात रॅली काढण्यात आली.

\यावेळी ते म्हणाले, गेल्या तीन चार महिन्यापासून मी महाराष्ट्रभर फिरतोय. आतापर्यंत पाच हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. या दरम्यान विविध मतदारसंघातील नागरीक, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यामध्ये जनतेचे प्रश्न कोण सोडवणार? असा प्रश्न विचारल्यानंतर नागरिकडून मला फक्त शिवसेना एव्हढेच ऐकायला मिळाले. लोकांचा आपल्या प्रश्‍नांसंदर्भात शिवसेनेवर विश्‍वास आहे हे स्पष्ट होते. शिवसेनेने दिर्घकाळ राज्यासाठी केलेले काम व राबविलेली धोरणे त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये हा विश्‍वास दिसतो. 

शिवसेना जात धर्म न पाहता काम करते. त्यामुळेच नागरिक आमच्या मागे आहेत. गेली पाच वर्षे आम्ही सत्तेत असताना देखील जेव्हा कुठे अन्याय झाल्यानंतर रस्त्यावर उतरत न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. सत्तेत राहून प्रशासन, समाजात परिवर्तन शक्‍य आहे. त्यामुळेच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मला पद नको आहे. मी एक स्वप्न घेऊन पुढे जातो आहे. राज्यातील जनतेच्या मनात काय आहे ? ते ऐकूण घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. शिक्षण, उद्योग आणि रोजगार या संदर्भात अनेक प्रश्न आहेत. त्यावर येणाऱ्या काळात काम करणार असल्याचेही ठाकरे म्हणाले. 

खास विद्यार्थ्यांसाठी तीन हजार बस सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला दहा हजार रुपये देणार. सध्या खड्डे आहे का रस्ते हे कळत नाही. त्यामुळे रस्ते सुधारण्यावर भर देऊ असेही ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख