विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता कोण याची उत्सुकता, आणि 7 नव्या सदस्यांना मिळणार संधी !

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता कोण याची उत्सुकता, आणि 7 नव्या सदस्यांना मिळणार संधी !

मुंबई : नव्याने निवडून आलेल्या विधानसभेत नेता कोण, याचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढ सुरू झाली आहे. विधान परिषदेचे चार आमदार विधानसभेत गेल तसेच तिघांनी पक्षांतर करताना राजीनामा दिल्यामुळे विधान परिषदेत सध्या सात जागा रिक्त आहेत, त्या जागांसाठी लवकरच निवडणूक होईल. 

काही सदस्य विधानसभेत निवडून गेल्यामुळे तसेच पक्षांतरामुळे विधिमंडळातील चार बड्या पक्षांचे संख्याबळ घटले आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे तानाजी सावंत हे अनुक्रमे पुणे व परांडा येथून निवडून आले आहेत. धनंजय मुंडे, राहुल नार्वेकर हे सदस्य देखील विधानसभेवर निवडले गेले तर रामराव वडकुते यांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीचे 17 हे संख्याबळ आता 14 झाले आहे. कॉंग्रेसचे अमरीश पटेल भाजपमध्ये झाले तर चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेचे गेले. या दोघांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे 16 संख्याबळ आता राष्ट्रवादीकॉंग्रेस एवढे म्हणजे 14 झाले आहे. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आता रिक्त झाले आहे. वरिष्ठांच्या या सभागृहात हेमंत टकले राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. मुंडेंच्या जागी त्यांना विरोधी नेतेपदी संधी मिळण्याची शक्‍यता आहे. शरद रणपिसे कॉंग्रेसचे गटनेते आहेत. इतर छोट्या पक्षांच्या पाठिंबा घेऊन कॉंग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास भाई जगताप किंवा शरद रणपिसे यांना संधी मिळेल. युतीचे सरकार सत्तारूढ झाल्यास तिसरा मोठा पक्ष म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे जाईल. त्यामुळे आघाडीत सामंजस्य राहिल्यास राष्ट्रवादी परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसलाही देऊ शकते. 

नवविर्वाचित सदस्यांना शपथ देण्यासाठी तसेच बहुमत सिद्ध करण्यासाठी 9 नोव्हेंबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात येईल. त्यावेळी परिषद भरवण्यात येणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ सभागृहातील उलथापालथी नागपूर येथे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील हिवाळी अधिवेशनात घडू शकतात. 

सध्याचे पक्षीय बलाबल, एकूण सदस्य 78 भाजप 21, शिवसेना 12, राष्ट्रवादी 14 , कॉंग्रेस 14 , अपक्ष 6, छोटे पक्ष 4 , रिक्त 7 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com