सेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसचे नवे सूत्र - 15 : 16 : 13

...
new power sharing formula
new power sharing formula

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तीन पक्षांच्या महाआघाडीचा नवा फाॅर्म्यूला ठरत असून त्यात काॅंग्रेसच्या तीन जागा कमी होत आहेत. या सूत्रावर अजून अंतिम शिक्कामोर्तब व्हायचे असून खातेवाटपही अजून निश्चित झालेले नाही.

आधी ठरलेला फॉर्म्युला होता 15 :15:12. म्हणजे यात शिवसेनाला 15 मंत्री अधिक मुख्यमंत्री म्हणजे 16 एकूण मंत्रिपदे होती. आता

आता नवीन फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 15 मंत्रिपदे असतील. त्यात 11 कॅबिनेट + 4 राज्यमंत्री ह्यात मुख्यमंत्री आले.

राष्ट्रवादीला पदे 16- यात 12 कॅबिनेट+ 4 राज्यमंत्री (यात उपमुख्यमंत्री आले)

काँग्रेस 13 पदे- 9 कॅबिनेट+ 3 राज्यमंत्री + विधानसभा अध्यक्ष

महाराष्ट्रात नियमानुसार 43 मंत्री नेमता येऊ शकतात. शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. काॅंग्रेसकडे 44 आणि राष्ट्रवादीकडे 54 आमदार आहेत. याशिवाय काही बहुजन विकास आघाडी, शेतकरी संघटना आणि अपक्षांमळे महाआघाडीकडे 169 आमदार असल्याचे विधानसभेत स्पष्ट झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com