कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णींसह नव्या चेहऱ्यांचीही भाजपमध्ये चर्चा

कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णींसह नव्या चेहऱ्यांचीही भाजपमध्ये चर्चा

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सुशील मेंगडे, अमोल बालवडकर यांच्यासह 13 इच्छुकांनी आज भाजपकडे मुलाखत दिली. पती-पत्नी असलेले संदीप खर्डेकर आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर या जोडीनेही दोघांपैकी एकाला संधी देण्याची मागणी केली.  

या मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी देणार की पक्ष नव्या उमेदवाराला पसंती देणार याची चर्चा सुरू झाली आहे. 

कोथरूड हा भाजपाचा सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी मिळाली तरी आमदार नक्की होणार अशी स्थिती आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्या ऐवजी उमेदवारी द्यायची पक्षाने ठरवले तर तीन-चार चांगले पर्याय पक्षासमोर आहेत.

मुलाखतीच्या निमित्ताने मुरलीधर मोहोळ, सुशील मेंगडे, अमोल बालवडकर यांच्या रूपाने नवे तरूण चेहऱ्यांची चर्चा सुरू झाली आहे. या सर्वच इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून आपापल्या परीने निवडणुकीची तयारी केलेली आहे. नव्या चेहऱ्यांशिवाय शाम सातपुते या पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्यानेदेखील उमेदवारी मागितली आहे.

लोकसभा आणि महापालिका निवडणुकीत कोणी कसे काम केले, कोणाच्या वाॅर्डात पक्षाला किती मते मिळाली, याबाबतही इच्छुकांनी या वेळी सांगितले. या मतदारसंघात पक्षात जोरात स्पर्धा आहे. त्यामुळे मुलाखतीच्या वेळी काही ठिणग्या उडतील की काय, अशी धास्ती अनेकांना होती. शेलार यांनी सर्वांनाच एकत्र बोलावून घेऊन चर्चा केली. शक्तिप्रदर्शन करण्यास मज्जाव केल्याने या मुलाखती शिस्तीत पार पडल्या. 

मेधा कुलकर्णी 
मुरलीधर मोहोळ 
सुशील मेंगडे 
राजेश बराटे 
अमोल बालवडकर 
विशाल गांधिले 
संदीप खर्डेकर 
शामराव सातपुते 
मंजुश्री खर्डेकर 
निलेश निढाळकर 
योगेश राजापूरकर 
मेधा कुलकर्णी 
राहूल कोकाटे 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com